VIDEO : Nandurbar Accident | दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

| Updated on: Nov 16, 2021 | 9:06 AM

नंदुरबार जिल्ह्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर मोदलपाडा गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

VIDEO : Nandurbar Accident | दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
Nandurbar Road Accident
Follow us on

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर मोदलपाडा गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गाची भीषण दुरावस्था

नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग केले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्गाची भीषण अशी दुरावस्था पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर आणि शेवाळी-नेत्रं या महामार्गाची निर्मिती करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली होती. मात्र, याची दुरवस्था झाली आहे.
तरी देखील राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभाग या गोष्टीकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. वारंवार तक्रार करुन देखील लक्ष न दिल्यामुळे आज दोन युवकांच्या या रस्त्यामुळे मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? असाच प्रश्न आता सामान्यांकडून विचारला जात आहे.

नंदुरबार जिल्हा आदिवासी दुर्गम भाग असल्यामुळे जिल्ह्याच्या स्थानकापासून शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव जाण्यासाठी आणि जवळ असलेले गुजरात राज्याला आणि मध्यप्रदेश राज्यांना जोडणारे महत्त्वाचे महामार्ग आहेत. या महामार्ग संदर्भामध्ये अनेक वेळा सामाजिक संघटना राजकीय पदाधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार केली होती. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे आज या खराब रस्त्यांमुळे दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

या रस्त्यावर वारंवार अपघात होतात

जिल्ह्यातील या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होत असतात. अपघात झाले की तेवढ्यापुरती डागडुजी केली जात असते. मात्र, नंतर जैसे थे तशीच परिस्थिती होत असते. मात्र, यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून कुठलाही ठेकेदार या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

हा जो अपघात घडला आहे, असे अपघात वारंवार होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतात. मात्र, नाही ते रस्ते व्यवस्थित होत नाही खराब रस्त्यांमुळे अपघात थांबत. त्यामुळे स्थानिक नागरिक आता प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Jodhpur Car Accident | भरधाव कारने आठ जणांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात