AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या गाडीचा अपघात झाला. वाळूच्या डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतत असताना तरुणांचा अपघात
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 9:30 AM
Share

जळगाव :  मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या गाडीचा अपघात झाला. वाळूच्या डंपरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात

जळगावपासून जवळच असलेल्या नशीराबाद येथील सुनसगाव रोडवरील उड्डानपुलाच्या खाली असलेल्या बोगद्याजवळून मित्राचा वाढदिवस साजरा करून येणाऱ्या तिघांना भरधाव वेगात येणाऱ्या रेतीच्या डंपरने जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. तर एकाला किरकोळ दुखापत झाली असून या दोघांवर उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

नशीराबादच्या सिद्धार्थ नगरात राहणारे विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय 25), रोहित दगडू इंगळे ( वय25), उदय भगवान बोदळे (वय 23)असे तिघेजण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा झाल्यावर घराकडे परतत असताना सुनसगाव रोड कडून महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात विशाल रमेश रंधे (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला.

मृत विशालच्या नातेवाईकांचा रुग्णालयासमोर हंबरडा

रोहित दगडू इंगळे (वय 25) याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. तिघा मित्रांच्या अपघाताने नशिराबादसह परिसरात शोकाकुल वातावरण आहे. तर मृत विशाल रंधेच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला.

(maharashtra Jalgaon Bike Accident 3 youths returning home after celebrating friend birthday, one dies on the spot)

हे ही वाचा :

अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

नांदेडच्या सरकारी दवाखान्यात चोरट्यांचा डल्ला, 3 लाखांची मशीन पळवली, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.