AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

अकोल्यात 50 वर्षीय आसिफ पठाण यांची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातल्या भागवाडी येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय आसिफ पठाण यांची शहरातल्या रामदास पेठ मधील वनविभाग कार्यालयाच्या बाजूला दगडाने ठेचून हत्या केली आहे.

अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु
अकोल्यात 50 वर्षीय इसमाची हत्या
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 7:54 AM
Share

अकोला : अकोल्यात 50 वर्षीय आसिफ पठाण यांची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातल्या भागवाडी येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय आसिफ पठाण यांची शहरातल्या रामदास पेठ मधील वनविभाग कार्यालयाच्या बाजूला दगडाने ठेचून हत्या केली आहे.

अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट

अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. पण काही वैयक्तिक वाद होते का, आरोपी आणि मृत यांचं काही कनेक्शन होतं का?, नेमकी कोणत्या कारणाने ही हत्या केलीय? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हत्येची बातमी पोलिसांना कळताच घटनास्थळी रामदास पेठ पोलीस, सिटी कोतवाली पोलीस, SDO ,LCB पोलीस तर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.

हिंगोलीत पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात लाचप्रकरणी पीएसआय एसीबीच्या सापळ्यात अडकलाय. ऐन दिवाळीत महिनाभर पत्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी 10 हजाराची लाच मागितल्याने सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे याला लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली आहे.

पीएसआय नंदे यांनी  दहा हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रार कर्त्याकडे केली होती. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारल्यावर व उर्वरीत 7 हजार रुपये स्वीकारण्यास संमती देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक नंदे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

(maharashtra Akola Crime 50-year-old people was stoned to death in Akola)

हे ही वाचा :

Delhi Crime: धक्कादायक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्येच मृतदेह सापडला

बुलडाण्यात व्यापाऱ्याकडून जीएसटीच्या 17 कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर

लातूर शासकीय रुग्णालय : दिवा, धूर आणि अफवा; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.