बुलडाण्यात व्यापाऱ्याकडून जीएसटीच्या 17 कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दुर्गाशक्ती फुडस प्रा.लि. नावाचे दुकान आहे. या दुकानात शासनाच्या वतीने ग्राहकांकडून वस्तू व सेवा कर जमा केला जातो. मात्र हा कर वर्षानुवर्ष शासनाच्या तिजोरीत जमा न करता दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशीकांत सुरेका या व्यापाऱ्याने अफरातफर केली.

बुलडाण्यात व्यापाऱ्याकडून जीएसटीच्या 17 कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर
crime
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 1:50 AM

बुलडाणा : सुनियोजीत गुन्हेगारी करीत ग्राहकांकडून जमा केलेले वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) 17 कोटींची फसवणूक आणि अफरातफर प्रकरणी खामगाव दुर्गाशक्ती फूड्स प्रा. लि.च्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटीच्या प्रकरणातील राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. शशीकांत सुरेका असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. त्याच्यावर सुनियोजितपणे शासनाची फसवणूक, अफरातफर आणि शासकीय रक्कमेच्या करचुकवेगिरी प्रकरण खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील पहिला तर देशातील सहावा गुन्हा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दुर्गाशक्ती फुडस प्रा.लि. नावाचे दुकान आहे. या दुकानात शासनाच्या वतीने ग्राहकांकडून वस्तू व सेवा कर जमा केला जातो. मात्र हा कर वर्षानुवर्ष शासनाच्या तिजोरीत जमा न करता दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशीकांत सुरेका या व्यापाऱ्याने अफरातफर केली. यामुळे या व्यापाऱ्यावर वस्तू व सेवाकर कायदा 2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा राज्यातील पहिला तर देशातील सहाव्या क्रमांकाचा गुन्हा असल्याचे समजते.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्यान्वये गुन्हा दाखल

जीएसटीच्या कलम 62 अन्वये वस्तू व सेवा कर विभागाने आदेश पारीत करीत अमरावती विभागीय सह आयुक्त टी.के. पाचरणे यांच्या आदेशान्वये खामगाव येथील सहा. आयुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत यांनी खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजी नगर पोलिसांनी दुर्गाशक्ती फूडसचे संचालक आणि मालक शशीकांत सुरेका यांच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 कलम 132 (1), (ड), 132 (2), भादंवि कलम 420, 406, 409, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुर्गाशक्ती फूडस प्रा.लि. ही कंपनी गुन्हेगारीरित्या सराईत विवरणपत्र कसुरदार असून वस्तू व सेवाकर कायदा 2017 च्या कलम 62 (1) अन्वये कालावधी निहाय एकतर्फी निर्धारणा आदेश पारीत करण्यात आले आहे. निर्धारणा आदेशाप्रमाणे एकूण 16 कोटी 69 लाख 2 हजार 977 एवढी कर आकारणी करण्यात आली होती, जी त्यांनी भरली नाही. यामुळे सुरेका यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली आहे. सहायक आयुक्त यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून यात आरोपींची संख्या सुद्धा वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Fraud and embezzlement of Rs 17 crore of GST from a trader in Buldana)

इतर बातम्या

Kolkata Extra Marital Affairs: कोलकात्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून अल्पवयीन मुलासमोर पतीकडून पत्नीची हत्या

लातूर शासकीय रुग्णालय : दिवा, धूर आणि अफवा; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.