नांदेडच्या सरकारी दवाखान्यात चोरट्यांचा डल्ला, 3 लाखांची मशीन पळवली, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातील तीन लाखांची मशीन चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना काल (10 नोव्हेंबर) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेडच्या सरकारी दवाखान्यात चोरट्यांचा डल्ला, 3 लाखांची मशीन पळवली, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नांदेडच्या सरकारी रुग्णालयात चोरी
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 8:30 AM

नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातील तीन लाखांची मशीन चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना काल (10 नोव्हेंबर) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन रुग्णालयातील मशीन चोरली.

चोरट्यांनी 3 लाखांची मशीन पळवली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णूपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय परिसरात सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प आहे. विष्णूपुरी भागातील शासकीय रुग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाचेठिकाणी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेचेदरम्यान, तीन लाखांची पाईप जेटेरिटर मशीन उतरवण्यात आली. उपरोल्लेखित मशीन ही जाळीमध्ये असल्याने ती तशीच उपरोक्त ठिकाणी ठेवण्यात आली.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाच्याठिकाणी ठेवण्यात आलेली तीन लाख रूपये किंमतीच्या मशीनची जाळी तोडली. चोरटे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी उपरोल्लेखित मशीनची जाळी तोडली व मशीनमधील पाईप ‘जेटेरिटर’ मशीन चोरून नेली. या प्रकरणातील फिर्यादी प्रविण पाठणे यांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान, उपरोक्त ठिकाणी जावून पाहणी केली असता, त्याठिकाणी ठेवलेली मशीन चोरट्यांनी चोरून नेली असल्याची बाब त्यांच्या निदर्शनाला आली. एकूणच, या धाडसी चोरीमुळे विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय ‘वैद्यकीय’ महाविद्यालय व रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी प्रविण गजानन पाठणे यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्र. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव गवळी व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

(maharashtra Nanded Crime News government hospital theft, thieves Stolen 3 lakh machine)

हे ही वाचा :

अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

धक्कादायक! जयपूरच्या आश्रमात दारु पार्टी आणि अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचाराची घटना, संचालक पोलिसांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.