AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! जयपूरच्या आश्रमात दारु पार्टी आणि अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचाराची घटना, संचालक पोलिसांच्या ताब्यात

आश्रमातील दारु पार्टी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी आश्रमाचा संचालक आणि काही संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

धक्कादायक! जयपूरच्या आश्रमात दारु पार्टी आणि अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचाराची घटना, संचालक पोलिसांच्या ताब्यात
crime
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 2:13 AM
Share

जयपूर : शहरातील एका अनाथाश्रमात राहणाऱ्या 8 ते 10 वर्षे वयोगटातील 8 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जयपूर, भरतपूर, अजमेर, दौसा आणि लगतच्या जिल्ह्यातील 19 मुले आश्रमात राहत आहेत. या छेडछाडीच्या तक्रारीचा ऑडिओ बाल आयोगाकडे पोहोचताच आश्रमातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली आणि कारवाईला सुरुवात झाली. चाइल्डलाइन जयपूरच्या समुपदेशक शांती बेरवाल यांनी बुधवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

संचालकाला अटक

आश्रमातील दारु पार्टी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी आश्रमाचा संचालक आणि काही संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. गुरुवारी तेथे राहणाऱ्या मुलांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले.

मुलांनी दिली धक्कादायक माहिती

समुपदेशक शांती बेरवाल यांच्या म्हणण्यानुसार, आश्रमात उपस्थित मुलांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या वेदना ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी एक 16 वर्षीय किशोरवयीन मुलगा आश्रमात आला होता. या अल्पवयीन मुलाने या मुलांसोबत विनयभंग व घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच मुलाचे आणखी दोन साथीदार आश्रमात आले. त्यांचे वयही सुमारे 16 ते 17 वर्षे आहे. हे तिघेही आश्रमात राहणाऱ्या 8 ते 10 वर्षांच्या मुलांसोबत घाणेरडे कृत्य करायचे. त्यांना धमकावून गप्प बसलवायचे. त्याचा व्हिडीओही बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची पडताळणी केली जात आहे.

रोज दारूची पार्टी व्हायची

आश्रमात रोज दारूची पार्टी होत असे. धनत्रयोदशीच्या रात्रीही आश्रमात दारूची मेजवानी होती. नृत्यही होते. दरम्यान, आश्रमात राहणाऱ्या एका तरुणाने मोबाईलवरून दारू पार्टीचा व्हिडिओ बनवला. हाच व्हिडिओ बाल आयोगाच्या एका कर्मचाऱ्याला मोबाईलवर पाठवण्यात आला होता. (Incident of sexual harassment with a liquor party and minors at an ashram in Jaipur)

इतर बातम्या

जबलपूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

बुलडाण्यात व्यापाऱ्याकडून जीएसटीच्या 17 कोटी रुपयांची फसवणूक आणि अफरातफर

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.