AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबलपूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ही घटना घडली त्यावेळी आमदार वडील संजय यादव हे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि आई भोपाळला गेली होती.

जबलपूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
जबलपूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 2:08 AM
Share

जबलपूर : बरगी येथील काँग्रेस आमदार संजय यादव यांचा धाकटा मुलगा वैभव यादव (विभू) याने गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून घेतली. घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली असली तरी त्यात आत्महत्येचे कारण लिहिलेले नाही. विभूने सगळं छान लिहिलंय. त्यामुळे सर्व काही ठीक असताना त्याने आत्महत्या का केली, हे पोलिसांनाही समजू शकलेले नाही.

ही घटना घडली त्यावेळी आमदार वडील संजय यादव हे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि आई भोपाळला गेली होती. वैभवचा मोठा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता, यावेळी वैभवने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि वडिलांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली.

आई, बाबा आणि भाऊ सगळे चांगले आहेत…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवने आत्महत्येपूर्वी सुमारे चार पानांची सुसाईड नोटही ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्याच्या सुसाईड नोटमध्ये वैभवने आई-वडील, भाऊ आणि मित्रांचे कौतुक केले आहे. यासोबतच वैभवने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या काही मित्रांना मेसेजही पाठवला होता, ज्यामध्ये तो त्याच्या मित्राकडे जात असल्याचे लिहिले होते. तुम्ही सगळे खूप चांगले मित्र होता.

तुम्ही सर्व खूप छान आहात…

विभूने त्याच्या पाच मित्रांना टेक्स्ट मेसेज पाठवले होते. त्यात त्याने लिहिले की, “तुम्ही सर्व खूप चांगले आहात, स्वतःची काळजी घ्या. मी सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, “माझे आई-वडील आणि भाऊ सर्व ठीक आहेत. माझी त्यांच्याविषयी काही तक्रार नाही. मी आता माझ्या मित्राकडे येत आहे.”

कुटुंबाला मानसिक धक्का

या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विभू मानसशास्त्र शिकत होता. पुढील शिक्षणासाठी तो परदेशात जाणार होता. पण जीवनाचा हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच त्याने संपवला. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. आमदार संजय यादव यांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि नेते रुग्णालयात पोहोचले. पोलिसांच्या पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस आणि एफएसएलच्या पथकाने आमदार निवास गाठून घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (Congress MLA’s son commits suicide in Jabalpur)

इतर बातम्या

Kolkata Extra Marital Affairs: कोलकात्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून अल्पवयीन मुलासमोर पतीकडून पत्नीची हत्या

लातूर शासकीय रुग्णालय : दिवा, धूर आणि अफवा; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.