भंडारा जिल्ह्यात खड्ड्याने घेतला प्राध्यापकाचा जीव, ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू

| Updated on: Sep 16, 2021 | 5:03 PM

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात खाली पडून एका प्राध्यपकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील जांभळी सड़क येथे घडली असून टालीकराम बाहेकर असं मृत्यू झाल्येल्या प्राध्यापकाचं नाव आहे.

भंडारा जिल्ह्यात खड्ड्याने घेतला प्राध्यापकाचा जीव, ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू
BHANDARA ACCIDENT
Follow us on

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात खाली पडून एका प्राध्यपकाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील जांभळी सड़क येथे घडली असून टालीकराम बाहेकर असं मृत्यू झाल्येल्या प्राध्यापकाचं नाव आहे. प्राध्यापक ट्रकच्या मागील चाकात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. (professor of bhandara district died in accident due to potholes)

खड्डा चुकविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले

मिळालेल्या माहितीनुसार मुंडीपार सडक येथील तिरुपती विद्यालय तथा स्वर्गीय निर्धराव पाटील वाघाये या कनिष्ठ महाविद्यालयात टाकीलराम बहेकर हे इतिहास विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. टालीकराम बहेकर कॉलेजचे काम आटोपून दुचाकीने निघाले होते. ते साकोली येथील त्यांच्या राहत्या घरी जात होते. यावेळी जांभळी सड़क येथील सराठी शिवारात महामार्गावरील खड्डा चुकविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तसेच दुचाकी खाली पडल्यामुळे तेही रस्त्यावरच कोसळले. याचवेळी नागपूरहून रायपूरला जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या मागील चाकात त्यांचे डोके आले. या दुर्दैवी अपघातात प्रोफेसर बहेकर यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल 

या घटनेची माहिती समजताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळई अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साकोली पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हटवून मृतदेह रुग्णालयात पाठविला. तसेच ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे एका अतिशय विनयशील आणि हुशार प्राध्यापकाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खड्डे बुजण्याची प्रवाशांची मागणी 

दरम्यान, हा प्रकार घडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने एका निष्पाप प्राध्यापकाच्या मृत्यू झाल्याची भावना नागरिक तसेच विद्यार्थी व्यक्त करत आहेत. तसेच सरकारने आतातरी रस्त्यांची दुरुस्ती करवी अशी मागणी केली जात आहे.

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या तरुणांचा अपघात

दुसरीकडे अपघाताचा असाच प्रकार पुण्यात घढला. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बाईकने निघालेल्या तरुणांना पुण्यात अपघात झाला. कर्वेनगर भागातील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघाही बाईकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ऐन गणेशोत्सवात कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. शंकर इंगळे (वय 27 वर्ष) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय 20 वर्ष, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत, संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेखची चौकशी करणार

Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!

गणपती दर्शनाला जाताना अपघात, उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून पुण्यात बाईकस्वारांचा मृत्यू

(professor of bhandara district died in accident due to potholes)