CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

नाशिक येथे अस्थी विसर्जन केल्यानंतर औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथे जाण्यासाठी निघालेला टेम्पो येवल्यात उभा असताना अर्टिगा कारने मागून येऊन जोरदार धडक दिली.

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक
नाशिकमध्ये अर्टिगाची टेम्पोला धडक

नाशिक : अस्थी विसर्जन केल्यानंतर गावी निघालेला टेम्पो रस्त्यात थांबला असताना अर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हा अपघात झाला. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

नाशिक येथे अस्थी विसर्जन केल्यानंतर औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथे जाण्यासाठी निघालेला टेम्पो येवल्यात उभा असताना अर्टिगा कारने मागून येऊन जोरदार धडक दिली. आधीच नातेवाईकाच्या निधनाचा धक्का पचवणाऱ्या कुटुंबाला अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथील दहा ते बारा जण हे टेम्पोने नाशिक येथे आपल्या नातेवाईकाच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी रामकुंडावर गेले होते. अस्थिविसर्जन करुन परत आपल्या गावी जाण्यासाठी ते टेम्पोने निघाले होते.

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला धडक

गाडीतील खाण्यापिण्याच्या वस्तू संपल्याने काहीतरी घेण्यासाठी रात्री 9 वाजताच्या सुमारास टेम्पो येवला शहरातील मालेगांव-नगर राज्य मार्गावर रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. रस्त्यात खड्डे असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटून भरधाव वेगातील Mh 02 CV 4332 क्रमांकाची अर्टिगा कार उभ्या असलेल्या MH 04 CP 7403 क्रमांकाच्या टेम्पोवर आदळली.

तीन ते चार जण किरकोळ जखमी

यावेळी टेम्पोतील तीन ते चार जण हे रस्त्यावर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करुन सर्व जण हे आपल्या गावी चिंचखेड येथे निघून गेले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादेत आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवरच प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

अंबरनाथमध्ये 12 सप्टेंबरला संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

संबंधित बातम्या :

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI