उपासमारीला वैतगाली, लेकरांना घेऊन तलावाजवळ आत्महत्येसाठी पोहोचली, पोलिसांच्या सतर्कतमुळे महिलेसह तिघांचा जीव वाचला

| Updated on: Sep 13, 2021 | 9:16 AM

उपासमारीची वेळ आल्याने आपल्या दोन मुलांसह एक महिला संभाजी तलावात आत्महत्या करण्याच्या इराद्याने आली होती. मात्र. पोलिसांच्या आणि नगरसेविकेच्या सतर्कतेने तिघांचे प्राण वाचले आहेत.

उपासमारीला वैतगाली, लेकरांना घेऊन तलावाजवळ आत्महत्येसाठी पोहोचली, पोलिसांच्या सतर्कतमुळे महिलेसह तिघांचा जीव वाचला
पोलिसांच्या सतर्कतेनं तिघांचा जीव वाचला
Follow us on

सोलापूर: उपासमारीची वेळ आल्याने आपल्या दोन मुलांसह एक महिला संभाजी तलावात आत्महत्या करण्याच्या इराद्याने आली होती. मात्र. पोलिसांच्या आणि नगरसेविकेच्या सतर्कतेने तिघांचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी आणि नगरसेविकेनं सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं समुपदेशन करुन तिला पुन्हा घरी सोडलं. याशिवाय तिला दोन महिन्याचं अन्नधान्य देखील उपलब्ध करुन दिलं आहे.

सतर्कतेनं वाचले तिघांचे प्राण

सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरातल्या संभाजी तलाव परिसरातील ही घटना आहे. तलाव परिसरात एक महिला दोन मुलासोबत संशयरित्या फिरत असताना दिसली, पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे विश्वासात घेऊन तिचे नाव व पत्ता विचारले. पोलिसांना तिनं ती शहरातील भारतरत्न इंदिरा नगर परिसरात असल्याचे सांगितले. पोलिसांनी आणि नगरसेविकेनं तिला महिलेला या ठिकाणी फिरण्याचे कारण विचारले असता तिने पती आपणास सोडून गेला असल्याचं सांगितलं. सध्या ती तिच्या दोन मुलांसमवेत राहात असून व्हिडिओ बनवण्याचे काम करत आहे मात्र सध्या काम नसल्यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महिलेचं समुपदेशन दोन महिन्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था

संबंधित महिलेनं उपासमारीला वैतागून आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगितले. हे कारण समजतात ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून या महिलेचे समुपदेशन केले. महिलेच्या दोन महिन्याच्या अन्नाची व्यवस्था करून तिला मुलासह सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.

पीएचडी प्रवेश परिक्षा पुन्हा होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. या आधी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्या होत्या. त्यामुळे मराठी विषयाच्या पीएचडी प्रवेशासाठी पुन्हा एकदा प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

सोलापुरात कोरोनाचे 3 तर म्युकर मायकोसिसचे 3 रुग्ण

सोलापूरमध्ये गेल्या 24 तासात शहरात पुन्हा कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे 181 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूरमध्ये म्युकर मायकोसिसचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. आजवर जिल्ह्यात 674 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत 95 जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू जणांचा झाला आहे. 558 जण उपचारांअंती बरे झाले आहेत.

इतर बातम्या:

आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा भाजपला रामराम, हाती बांधलं ‘घड्याळ’

पोस्टाच्या योजनेत महिन्याला 2850 रुपये जमा करा आणि मिळवा 14 लाख रुपये

Solpaur Police and Corporator saved life of Woman and two children who going to commit suicide due to Hunger