एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी सांगलीत उद्यापासून एसटी कामगारांचा संप, कामबंद आंदोलनाचा निर्णय

| Updated on: Nov 02, 2021 | 4:11 PM

मान्यताप्राप्त संघटनांनी एसटी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सांगली आगारातील अनेक कर्मचारी उद्यापासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी सांगलीत उद्यापासून एसटी कामगारांचा संप, कामबंद आंदोलनाचा निर्णय
Follow us on

सांगली : एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या राज्यव्यापी संपात सांगलीतील एसटी कामगार उद्यापासून सहभागी होणार आहेत. याबाबत सांगली आगारातील कामगारांनी एसटी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन संपाचे निवेदन दिले. तसेच एसटी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या आंदोलकांना भाजपाने पाठिंबा दिला आहे. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर संप सुरू आहे. याच मागणीसाठी राज्यात एसटी कामगार आत्महत्या करत आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या संपात सांगली आगाराचे एसटी कामगार, चालक वाहक, तांत्रिक कर्मचारी सहभागी होत उद्यापासून संपावर जात आहेत. (ST workers strike in Sangli from tomorrow for merger of ST Corporation)

मान्यताप्राप्त संघटनांनी एसटी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सांगली आगारातील अनेक कर्मचारी उद्यापासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. या सर्वच आंदोलक एसटी कामगारांनी आज एसटी नियंत्रकांना तसे निवेदन देत उद्यापासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात भाजपाचे स्थानिक नेते सहभागी होणार असून एसटी विलिनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

सोलापूरमध्ये कोणत्याही संघटनांशिवाय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांकडून इतके दिवस आंदोलने, संप केले जात होते. आता कोणत्याही संघटनेशिवाय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारला आहे. थकीत वेतनासाठी अन्य मागण्यांसाठी श्रमिक कृती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आला होता. या आंदोलनानंतर अंशतः काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या, मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली नाही, त्यामुळे एसटीच्या वाहक चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. सोलापूर विभागातही गेल्या चार दिवसापासून वाहक चालक नाही तर कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवास भाडे कमालीचे वाढले आहे तर खासगी वाहतूक करणाऱ्या कार आणि जिपनेही भाडे वाढवले आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आगारातल्या 66 पैकी एकही बस गेल्या चार दिवसात धावलेली नाही. अहमदपूर आगारातील बसेसच्या 1344 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या आगारातील 471 कर्मचारी या संपात उतरले आहेत.

अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता, घरभाडे वाढीचा प्रश्न मार्गी लावलाय. वेतनवाढीचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं परब यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कामावर यावं, दिवाळी आहे, असं आवाहन परब यांनी केलंय. (ST workers strike in Sangli from tomorrow for merger of ST Corporation)

इतर बातम्या

Video: वर्षभर गळ्यात टायर घेऊन फिरला, जखमी जिराफाची वनकर्मचाऱ्यांनी अशी केली सुटका!

सिंगल चार्जमध्ये 520km रेंज, शानदार इलेक्ट्रिक MPV भारतात लाँच, किंमत…