सिंगल चार्जमध्ये 520km रेंज, शानदार इलेक्ट्रिक MPV भारतात लाँच, किंमत…

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहने सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि भारतासह अनेक परदेशी कंपन्या येथे स्वतःच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. आता BYD या चिनी कंपनीने या सेगमेंटमध्ये आपली MPV कार लॉन्च केली आहे.

सिंगल चार्जमध्ये 520km रेंज, शानदार इलेक्ट्रिक MPV भारतात लाँच, किंमत...
BYD e6 MPV
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 3:25 PM

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहने सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि भारतासह अनेक परदेशी कंपन्या येथे स्वतःच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. आता BYD या चिनी कंपनीने या सेगमेंटमध्ये आपली MPV कार लॉन्च केली आहे. BYD हा चिनी ब्रँड आहे आणि आज त्यांनी देशातील पहिली इलेक्ट्रिक कार BYD e6 29.6 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह सादर केली आहे. (BYD India launches electric MPV e6 priced at 29.6 lakh rupees)

BYD e6 च्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर, ही कार सिंगल चार्जमध्ये 520 किमीची रेंज देऊ शकते आणि यात दिलेली बॅटरी केवळ 35 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. ही पूर्ण इलेक्ट्रिक एमपीव्ही आहे आणि सुरुवातीला बंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, विजयवाडा, कोची आणि अहमदाबाद येथे उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी सर्वोत्तम इन क्लास वैशिष्ट्यांसह ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

BYD e6 इलेक्ट्रिक MPV मध्ये 71.7 kWh चा लिथियम-आयर्न-फॉस्फेट बॅटरी पॅक वापरला जातो. कंपनीचा दावा आहे की ती WLTC आणि ARAI वर आधारित सिंगल चार्जवर 520 किमीची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. कारची बॅटरी 180 Nm पर्यंत जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे आणि या कारचा टॉप स्पीड 130 kmph इतका असेल. या कारमध्ये 580 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

BYD e6 चे फीचर्स

BYD e6 इलेक्ट्रिक MPV ला पुढील बाजूस MacPherson स्ट्रट्स, मल्टीलिंक रिअर सस्पेंशन, IPB इंटेलिजेंट ब्रेक कंट्रोल सिस्टीम मिळते, जी ब्रँडनुसार बॉशकडून फास्ट रिस्पॉन्स आणि लीनियर ब्रेकिंगसह मिळते. यात ब्लूटूथ आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह 10.1 इंच रोटेटेबल इन्फोटेनमेंट सिस्टिम, मेडिकल-ग्रेड फेस मास्क लेव्हलसह CN95 एअर फिल्टर समाविष्ट आहे, जे युजर्ससाठी उपयुक्त ठरेल.

BYD e6 कारवरील वॉरंटी

वॉरंटीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने BYD e6 कारवर तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे, तर बॅटरीवर कंपनीने 8 वर्षांची वॉरंटी दिली आहे, जी स्वतःमध्ये खूप खास आहे. यासोबतच कंपनीने मोटरवर 8 वर्षांची वॉरंटीही दिली आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(BYD India launches electric MPV e6 priced at 29.6 lakh rupees)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.