शिस्तीपेक्षा शिक्षाच अधिक ! तब्बल 63 गतिरोधकांमुळे डोकेदुखी वाढली, महिला सरपंचाचा गर्भपात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

| Updated on: Jun 14, 2021 | 6:19 PM

चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावरील वाहतुकीचे नियम हे सध्या लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत. या मार्गावर तब्बल 63 गतिरोधक असल्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी चांगलाच अडथळा निर्माण होत आहे.

शिस्तीपेक्षा शिक्षाच अधिक ! तब्बल 63 गतिरोधकांमुळे डोकेदुखी वाढली, महिला सरपंचाचा गर्भपात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
SPEED BREAKER
Follow us on

चंद्रपूर : रस्त्यावर वाहने चालवताना नियम पाळले जावेत असे सर्रासपणे सांगितले जाते. वाहतुकीचे नियम मोडल्यास अपघात होऊ शकतो हेही आपल्याला माहिती आहे. मात्र, चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावरील वाहतुकीचे नियम हे सध्या लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत. या मार्गावर तब्बल 63 गतिरोधक असल्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी चांगलाच अडथळा निर्माण होत आहे. तशा तक्रारी पर्यटक तसेच ग्रामस्थ करत आहेत. (Tadoba Andhari National Park way have 63 speed breakers people facing lots of problem while traveling)

शिस्तीपेक्षा शिक्षाच अधिक

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर तब्ल 63 गतिरोधक आहेत. या गतिरोधकांमुळे पर्यटक चांगलेच त्रस्त झालेयत. ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांना वेग तसेच शिस्तीपेक्षा 63 गतिरोधकांमुळे शिक्षाच अधिक मिळत असल्याचे वाटत आहे. तशा तक्रारी अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी केल्या आहेत.

महिला सरपंचाचा गर्भपात

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास जवळजवळ एकूण 15 गावे आहेत. या गावात राहणाऱ्या नागरिकांनाही या गतिरोधकांचा त्रास भोगावा लागतोय. वाहनांच्या वेगापासून वन्यजीवांना संरक्षण मिळावे यासाठी या मार्गावर एकूण 63 गतिरोधक उभारण्यात आलेले आहेत. आता हेच गतिरोधक मृत्यूचे कारण ठऱत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. मागील काही दिवसांपूर्वी गतिरोधकांमुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे सरपंच महिलेचा रुग्णालयात पोहोचतानाच गर्भपात झाल्याची घटना घडली. तसा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका बालकाला सर्पदंश झाल्यानंतर गतिरोधकांमुळे रुग्णालयात पोहोचण्यास त्याला उशीर झाला. परिणामी या बालकाला उशिराने उपचार मिळाला.

गतिरोधकांना गर्भपाताशी जोडणे चुकीचे

दरम्यान, गतिरोधकांच्या एवढ्या प्रमाणातील संख्येमुळे नागरिकांत रोष पसरला असला तरी अधिकाऱ्यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. महिला सरपंचांचा झालेला गर्भपात आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूला गतिरोधकांशी जोडणे चुकीचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.

इतर बातम्या :

‘बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद’, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

Photo : डाळिंबाचा महानैवेद्य आणि फुलांपासून शेषनागाच्या प्रतिकृतीची आरास…, ‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’चे हे फोटो पाहाच

मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड

(Tadoba Andhari National Park way have 63 speed breakers people facing lots of problem while traveling)