‘बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद’, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था ही शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद असून या प्रकाराला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करून संबंधित अधिकारी निलंबित करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. | Belapur Fort

'बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद', राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
बेलापूर किल्ल्याचा टेहाळणी बुरुज ढासळला
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 10:01 AM

नवी मुंबई : नवी मुंबई मुख्यालयासमोर असलेला ऐतिहासिक पेशवेकालीन बेलापूर किल्ल्याचा (Belapur Fort ) टेहळणी बुरुज पावसाची संततधार सुरु असल्याने ढासळला. या किल्लाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. चिमाजी आप्पा यांनी या किल्ल्याचं नामकरण केलं होतं या किल्ल्यावरून वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवली जात होती. ही नवी मुंबईतील एकमेव अशी ऐतिहास साक्षीदार असलेली वास्तू होती जी पावसामुळे ढासळली. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. बेलापूर किल्ल्याची झालेली दुर्घटना ही शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद असून या प्रकाराला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. (navi mumbai part of Belapur fort collapsed Due To Rain)

पेशवेकालीन बुरुज ढासळला

नवी मुंबईत दोन ते तीन दिवसांपासून पावसाची सतत बॅटिंग सुरू आहे. त्यात काही सखोल ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार समोर आले तर शुक्रवारी मध्यरात्री कोपरखैरणेमध्ये पाम सोसायटीत चार ते पाच गाड्यांवर झाडं पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यात शनिवारी सततच्या पावसाने नवी मुंबई मनपा वास्तू समोरचा पेशवेकालीन बुरुज ढासळला. या किल्ल्याच्या बुरुजाची डागडुजी न केल्याने हा बुरुज ढासळल्याचा आरोप काही तरुण करत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था ही शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद असून या प्रकाराला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करून संबंधित अधिकारी निलंबित करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. किल्ल्याची डागडुजी व्यवस्थितरित्या केली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितीन चव्हाण यांनी केला आहे.

किल्ल्याची काय अवस्था..?

बेलापूरचा किल्ला ज्या खाडीकाठी उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.

(navi mumbai part of Belapur fort collapsed Due To Rain)

हे ही वाचा :

नवी मुंबईतील इतिहासाचा साक्षीदार असलेली वास्तू कोसळली, बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.