AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ते परत कधीच दिसणार नाहीत… राज्यासाठी काळा दिवस; वेगवेगळ्या अपघातात एकाच दिवशी 10 ठार

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला, कारण राज्यातील विविध रस्ते अपघातांमध्ये एकाच दिवशी 10 लोकांचा बळी गेला. जळगाव, गोंदिया, लातूर, लोणावळा आणि रायगड येथे झालेल्या या जीवघेण्या घटनांमुळे अनेक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवदर्शन आणि सहलीसाठी निघालेल्या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला, तर 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

आता ते परत कधीच दिसणार नाहीत... राज्यासाठी काळा दिवस; वेगवेगळ्या अपघातात एकाच दिवशी 10 ठार
महाराष्ट्र अपघात
| Updated on: Dec 06, 2025 | 2:31 PM
Share

राज्यासाठी आजचा दिवश काळाकुट्ट ठरला आहे. राज्यात आज झालेल्या विविध अपघातात एकूण 10 जण ठार झाले आहेत. कुणी देवदर्शनाला जात होते. कुणी सहलीला जात होते. तर कुणी मित्रांसोबत जात असताना हा अपघात झाला. त्यामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या विविध अपघातात जवळपास 35 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम केला असून अधिक तपास सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा अयोध्यातील सुलतानपूर जवळ अपघात झाला आहे. या अपघातात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील महिलेचा मृत्यू झाला असून इतर 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव छोटी बाई पाटील असं आहे. त्या 55 वर्षाच्या आहेत. धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द येथील 30 महिला आणि 5 पुरुषां ग्रुप अयोध्येतील प्रयागराज येथे सहलीसाठी गेला होता. सर्वजण जळगावहून रेल्वेने काशी येथे पोहोचले. त्यानंतर तेथून वाहनातून प्रयागराज येथे जात असताना सुलतानपूर जवळ त्यांचा अपघात झाला.

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे जिल्हाधिकारी तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयागराजच्या प्रशासनाशी संपर्क साधला. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं. सर्वांना रेल्वेने जळगावात आणण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

उभ्या ट्रकला ट्रॅव्हलची धडक

गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या अपघातात 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदियातील रुग्णालयात उपचार सुरू असून 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास देवरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा भीषण अपघात झालाय. या प्रकरणाचा पुढील तपास देवरी पोलीस करत आहेत.

दोन मित्रांचा मृत्यू, सीसीटीव्हीत सर्व दिसलं

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथे झालेल्या भीषण अपघाताचा सीसीटिव्ही आता समोर आला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात आलेली कार थेट ट्रकवर आदळली. प्रचंड वेगात असलेल्या कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे चौपदरी असलेल्या या रस्त्यावर एकेरी मार्गावर हा अपघात घडला आहे. रविकुमार दराडे ( वय 20) आणि सागर ससाणे या दोन मित्रांचा अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोघेही अहमदपूरचे रहिवाशी होते.

लायन्स पॉइंटजवळच जीव सोडला

लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात झाला आहे. कार आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कार समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. तसेच हे दोघेही पर्यटक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

आयशर टेम्पोचा अनियंत्रित वेग, दोन वाहनांना जोरदार धडक

पुण्याहून खोपोलीकडे येणाऱ्या आयशर टेम्पोने पिकअप आणि कार या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. आयशर टेम्पो प्रचंड वेगात आला होता. टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात जाला. या अपघातात एकजण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या तिघांवर खोपोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

छोट्या पुलावरील अपघातात दोन ठार

रायगडच्या कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरवटे पाले ते संभे स्टॉप दरम्यान असलेल्या छोट्या पुलावरती स्कूटर आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहने आमनेसामने आल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दिनेश भिकू पवार यांचा मृत्यू झाला असून ते माणगावचे राहणारे आहेत. तर जाबीर इब्राहिम शाह यांचाही मृत्यू झाला आहे. ते रोहा घाटावर राहत होते. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील कुशीनगरचे रहिवाशी आहेत. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते अधिक तपास करत आहेत.

सिग्नलवर दोन वाहनांचा अपघात

नाशिकच्या त्र्यंबक नाका सिग्नलजवळ खाजगी बस आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप भररस्त्यात पलटी झाला. सुदैवाने दोन्ही वाहनांमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांच्या काचा फुटल्या.

लेणी बघायला जाताना….

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वरझडी येथून ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर खुलताबाद येथील कारखान्यावर जात होता. चौका घाट चढत असताना ट्रॅक्टरला लोड झेपला नाही. ट्रॅक्टर चढावर चढण्याऐवजी पाठीमागून येणाऱ्या एका कारवर उलटला. यामुळे भीषण अपघात झाला. कारमधील कुटुंब पडेगाव येथून अजिंठा लेणी बघण्यासाठी निघाले होते. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे चौका घाटात दोन तास वाहतूक खोळंबली होती. निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.