मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड

वसई विरार महापालिकेच्या तुलिंज हॉस्पिटलमधील एका महिला आणि पुरुष डॉक्टरसोबत असभ्य वर्तन करण्यात आले.

मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड
तुलिंज रुग्णालयातील घटना सीसीटीव्हीत कैद

वसई : महिला आणि पुरुष डॉक्टरला रुग्ण आणि त्याच्या मित्रांनी धक्काबुकी करुन अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा येथील तुलिंज हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे, तर तिघे जण फरार झाले आहेत. (Vasai Virar Doctor allegedly misbehaved by Patient and Friends)

मद्यधुंद रुग्णासह चौघांची डॉक्टरांना धक्काबुक्की

वसई विरार महापालिकेच्या तुलिंज हॉस्पिटलमधील एका महिला आणि पुरुष डॉक्टरसोबत असभ्य वर्तन करण्यात आले. दारुच्या नशेत आलेल्या रुग्ण आणि त्याच्या मित्रांकडून दोघांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याचप्रमाणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. तुलिंज हॉस्पिटलमधील केबिनच्या काचाही टोळक्याने फोडल्या. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

एकाला अटक, तिघे पसार

डॉक्टरांसोबत झालेला हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात चौघा जणांविरोधात संगनमताने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीन जण पसार झाले आहेत.

दारुच्या नशेत अश्लील कमेंट

रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चौघे तरुण दारुच्या नशेत रुग्णालयात आले होते. यांच्यापैकी एका तरुणाच्या तोंडाला मार लागला होता. यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरेश राठोड आणि डॉ. हीना चौधरी हे डॉक्टर कर्तव्यावर होते. जखमी तरुणाला मलमपट्टी रूममध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करत असताना त्याच्या सोबतचे अन्य जण दारुच्या नशेत अश्लील कमेंट करत होते.

यावेळी डॉ सुरेश राठोड यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी डॉक्टरांचीच कॉलर पकडून त्याना धक्काबुक्की केली. हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या केबिनच्या काचाही चौघांनी फोडल्या असल्याचा दावा डॉक्टर राठोड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

(Vasai Virar Doctor allegedly misbehaved by Patient and Friends)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI