AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव

मनाविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरुन आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील मीरतमध्ये ही घटना घडली होती.

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव
Death
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:22 PM
Share

लखनौ : 27 वर्षीय नवविवाहित मुलीची आई-वडिलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या 13 दिवसात पालकांनी लेकीचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे मुलीचा बळी गेल्याचा बनाव त्यांनी रचला होता. उत्तर प्रदेशातील मीरतमध्ये पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र तिचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे (Uttar Pradesh parents kill daughter upset with her for marrying against wish blame it on COVID-19)

कोरोना संसर्गाने मृत्यूचा बनाव

मनाविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरुन आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. सायना ही मीरतमधील लिसारी गेट भागातील रहिवासी होती. मे महिन्यात फर्मान नावाच्या तरुणासोबत तिचं लग्न झालं होतं. 31 मे रोजी सायनाचा गूढ मृत्यू झाला. पोटदुखीमुळे सायनाची प्रकृती बिघडली, तिला कोरोना संसर्ग झाला आणि तिचा मृत्यू झाला, असं तिच्या आई-वडिलांनी फर्मानला कळवलं. मात्र त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

सायनाच्या पतीला फोन कॉल

सायनाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर फर्मानला फोन आला. तुझ्या पत्नीची तिच्या पालकांनीच हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला. फर्मानने या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनाही ऐकवले. त्यानंतर पोलिसांनी सायनाच्या मृतदेहाची तपासणी केली. हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे अशा आरोपांखाली सायनाच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायनाच्या आई-वडिलांसह आरोपी कुटुंबीय पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सांगलीत मुलीच्या हत्येनंतर हार्ट अटॅकचा बनाव

दुसरीकडे, मुलगी विवाहास तयार होत नसल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी सांगलीत घडली होती. शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुलीच्या बापाने गुपचूप तिचा अंत्यविधीही उरकला. मात्र मृतदेह अर्धवट जळाल्यामुळे तो दफन करण्यात आला. हा सर्व धक्कादायक प्रकार सांगलीतील आटपाडी या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

संबंधित बातम्या :

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन, आठ दिवसांनंतर घटनेचा उलगडा

(Uttar Pradesh parents kill daughter upset with her for marrying against wish blame it on COVID-19)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.