डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

जिल्ह्यातील रायपूर येथे दहाव्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री 8 वाजता लाईट गेल्यानंतर हा प्रकार घडला.

  • Publish Date - 10:28 am, Sun, 8 November 20
डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ


बुलडाणा : जिल्ह्यातील रायपूर येथे दहाव्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री 8 वाजता लाईट गेल्यानंतर हा प्रकार घडला. अज्ञात आरोपीने डोक्यात दगड घातल्याने मुलीच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा केला आहे. (Buldhana murder of 16 year old girl)

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील रायपूर येथे काल (7 नोव्हेंबर) रात्री 8 वाजता लाईट गेली. यावेळी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडील दवाखान्यात गेले होते. मुलगी घरात एकटी असल्याचे कळताच अज्ञात आरोपी मुलीच्या घरात शिरला. यावेळी आरोपीने मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. मुलीच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यानंतर आई-वडील घरी येताच त्यांना आपल्या मुलीचा मृतदेह बाथरुमजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे रायपूरमध्ये तणावाचं वातावरण होतं. गावकऱ्यांनी काल रात्रीच घटनास्थळी गर्दी करुन आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली.

मृत मुलीचे कुटुंबीय रायपूर गावशेजारी एका शेतात राहतात. हे कुटुंब भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन आपला चरितार्थ भागवतं. अवघ्या दहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीची हत्या झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. घटना नेमकी कशामुळे घडली असावी यासोबतच मुलीसोबत काहीअनुचित प्रकार घडला का याचा शोध पोलिसांकूडन घेतला जातोय.

संबंधित बातम्या :

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या

पदभार स्वीकारताच पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धडाका, आठ वर्ष जुन्या हत्याकांडातील आरोपी गजाआड

(Buldhana murder of 16 year old girl)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI