पुण्यातील तरुणाची पनवेलमध्ये गळा दाबून हत्या; डायरीवरुन मृताची ओळख पटली; तपास सुरु

ओळखपत्र आणि पाकिटातील डायरीवरुन मृताची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.

पुण्यातील तरुणाची पनवेलमध्ये गळा दाबून हत्या; डायरीवरुन मृताची ओळख पटली; तपास सुरु
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 5:20 PM

नवी मुंबई : कळंबोली वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवळच असलेला स्मृतीवन गार्डनमध्ये (Pune Man Murder In Kalamboli) गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. 31 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. ओळखपत्र आणि पाकिटातील डायरीवरुन मृताची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, कळंबोली पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे. लवकरच या खुनाचा छडा लागेल असा विश्‍वास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे (Pune Man Murder In Kalamboli).

गुरुवारी कळंबोली सेक्टर 2 पूर्व सिडकोच्या स्मृतीवन गार्डन येथे अनोळखी मृत व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, अंमलदार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्व अधिकार, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित अनोळखी मृतदेहाची पाहणी केली. त्या ठिकाणी ओळखपत्र आणि पाकिटमध्ये डायरी आढळून आली. त्यावरुन मृताच्या नातेवाईकांचा शोध देण्यात आला आणि त्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आलं.

संबंधितांना मृतदेहाची ओळख पटली. त्यानुसार या तरुणाचे नाव नागनाथ कल्लप्पा माले असं असून तो 31 वर्षीय आहे. हा तरुण पुण्याचा राहणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या हत्येबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत यांनी भेट दिली. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंहसह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, पुढील तपास करीत आहेत.

Pune Man Murder In Kalamboli

संबंधित बातम्या :

आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, नंतर चाकूने वार, जळगावात माजी महापौराच्या मुलाची निर्घृण हत्या

दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.