दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय

कमी किंमतीत अमेरिकन डॉलर देतो, असं अमिष दाखवून दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना शीळडायघर पोलिसांनी अटक केली आहे (Ola driver cheated by passenger).

दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 7:18 PM

ठाणे : कमी किंमतीत अमेरिकन डॉलर देतो, असं अमिष दाखवून दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना शीळडायघर पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीची टोळी संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात शीळडायघर पोलीस ठाण्यात कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Ola driver cheated by passenger).

या प्रकरणातील फिर्यादी सोनाथ अयोध्या हे ओला कारचालक आहेत. त्यांना गाडीत एका प्रवाशाने डॉलरबाबत माहिती दिली. “माझी माऊशी केअरटेकर होती. तिच्याजवळ डॉलर होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ते सर्व डॉलर कमी किंमतीत एक्स्चेंज करायचे आहेत. कुणी डॉलर घेण्यास इच्छूक असेल, तर सांगा, कमी किंमतीत देऊ”, असं प्रवाशी कारचालकाला म्हणाला (Ola driver cheated by passenger).

कमी किंमतीत दुसरं कुणाला डॉलर देण्यापेक्षा आपणच डॉलर घेऊया, या विचाराने ओला कारचालकाने प्रवाशा जवळील डॉलर घेण्याचा निर्णय घेतला. प्रवासी आणि कारचालक यांच्यात ठरल्याप्रमाणे कारचालक आज (4 नोव्हेंबर) शीळफाटा येथे दोन लाख रुपये घेऊन दाखल झाला. त्यावेळी एका महिला आणि तरुणाने कारचालकाकडून 2 लाख रुपये घेऊन डॉलर दिले.

कारचालकाने घरी गेल्यावर डॉलरची पिशवी उघडून बघितली तेव्हा डॉलरच्या नोटांच्या बंडलमध्ये रद्दीचे कागद असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. आपण लुबाडलो गेलो, याची त्याला जाणीव झाली. त्यानंतर त्याने शीळडायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असता शीळफाट्यावर काही व्यक्ती डॉलर एक्सचेंज करण्याबाबत विचारत संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तातडीने शीळफाट्यावर दाखल होत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 डॉलर्स चलनाच्या 5 नोटा, 1 डॉलरची एक नोट, एक भगवा रंगाची पिशवी त्यामध्ये वर्तमानपत्राचे बंडल, 3 मोबाईल, 1500 रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्या अधिक चौकशीत आरोपींची 23 हजार 500 रुपयांची रिकव्हरी दिली असून त्यांचे अन्य साथीदारही आहेत, ते सर्व झारखंड आणि पश्चिम बंगालचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात किमान 6 ते 7 आरोपी समाविष्ट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा : नाशकात चोरांचा सुळसुळाट, दिवाळीच्या तोंडावर चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगच्या घटनांत वाढ

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.