AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीपीई कीट घातल्यानंतर काय होतं ? डॉक्टरांना मारहाण करण्यापूर्वी ‘हा’ फोटो पाहाच

डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफच्या समर्पणाची साक्ष देणार एक फोटो चर्चाचा विषय ठरतो आहे. हा फोटो पाहून अनेकांनी डॉक्टरांच्या कामाला सॅल्यूट ठोकला आहे. (dr sohil ppe kit sweating viral photo)

पीपीई कीट घातल्यानंतर काय होतं ? डॉक्टरांना मारहाण करण्यापूर्वी 'हा' फोटो पाहाच
dr sohil
| Updated on: May 01, 2021 | 7:06 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरी तसेच इतर औषधांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. औषधी वेळेवर मिळत नसल्यामुळे हजारो रुग्ण दगावत आहेत. अशा नाजूक परिस्थितीत देशातील कोरोना वॉरियर्स जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात दोन हात करत आहेत. लोकांना कोरोनाच्या दाढेतून आणण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करत आहेत. देशभरात डॉक्टरांच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतूक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफच्या समर्पणाची साक्ष देणार एक फोटो चर्चाचा विषय ठरतो आहे. हा फोटो पाहून अनेकांनी डॉक्टरांच्या कामाला सॅल्यूट ठोकला आहे. (Dr. sohil viral photo who treats corona patient goes viral wearing ppe kit and sweating body)

डॉ. सोहिल यांचा फोटो व्हायरल

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत विध्वंसक ठरते आहे. मृतांचे प्रमाण रोज वाढते आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र मेहनत करुन कोरोनाला थोपवलं. डॉक्टरांच्या समर्पणामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतसुद्धा डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आपली सेवा रुग्णांना देत आहेत. पीपीई कीट अंगावर परिधान करुन ते कोविड वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांवर उपचार करत आहे. असे असूनसुद्धा डॉक्टर, नर्सेस यांच्यासोबत वाद घालण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. मात्र डॉ. सोहिल (Dr. sohil) यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो आपल्याला खूप काही शिकवणारा आहे. डॉ. सोहिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते एका बाजूला पीपीई कीटमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूल घामाने ओलेचिंब झाले आहेत.

पाहा फोटो :

फोटो बघून डॉक्टरांना नमन

डॉ. सोहिल गुजरातमधील Dharpur येथील GMERS Hospital मध्ये कोरोना रुग्णांचा उपचार करतात. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला त्यांनी पीपीई किट घातल्याचे दिसतेय. तर फोटोच्या दुसऱ्या बाजूला पीपीई कीट काढल्यानंतर ते घामाने ओलेचिंब झाल्याचे दिसत आहेत. डॉक्टरांना फक्त रुग्णांवर उपचार करायचे असतात ही धारणा अनेकांची आहे. रुग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणींकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र, डॉ. सोहिल यांचा फोटो पाहून अनेकांना डॉक्टर्स सध्या कोणत्या परिस्थित काम करत आहेत, याच अनेकांना कल्पना येत आहे. पीपीई कीट घातल्यानंतर शरिरातून कसा घाम फुटतो, हे डॉ. सोहिल यांनी अपलोड केलेल्या फोटोमधून पाहायला मिळते आहे.

दरम्यान, डॉ. सोहिल यांनी हा फोटो अपलोड केल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला. त्यांच्या या फोटोमुळे डॉक्टरांची सध्याची परिस्थिती समोर आल्यामुळे अनेकांनी डॉक्टरांप्रती आदर व्यक्त केला आहे.

इतर बातम्या :

Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल

Video | कोरोनाग्रस्त तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “कोरोनासे नही, इस ‘विदेशी पंखेसे’ डर लगता है साहेब !”

(Dr. sohil viral photo who treats corona patient goes viral wearing ppe kit and sweating body)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.