Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल

Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल
NURSE VIRAL VIDEO

एका नर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या नर्सचे रुग्णांप्रति असलेले समर्पण सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. (nurse feeding meal corona patient)

prajwal dhage

|

May 01, 2021 | 6:00 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाला आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांच्या घरात पोहोचलीये. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे. औषधी उपलब्ध नसल्यामुळे कित्येक नागरिकांचा तडफडून मृत्यू होत आहे. अशा नाजूक परिस्थितीत मात्र आपले आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. सध्या अशाच एका नर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या नर्सचे रुग्णांप्रति असलेले समर्पण सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. (video of nurse feeding meal to Corona patient goes viral)

नर्सेच्या कामाची देशभरात चर्चा

सध्या एका नर्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला मध्ये प्रदेशच्या राज्य माहिती आयुक्तांनी आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक नर्स कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असल्याचे दिसत आहे. तिच्यासमोर एक कोरोनाग्रस्त महिल झोपलीये. तिची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला कृत्रिम ऑक्सिजन प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. तिची काळजी घेण्यासाठी असलेली नर्स या महिला रुग्णाला स्वत:च्या हाताने जेवण भरवते आहे. कोरोनाग्रस्त महिलेला जेवता येत नसल्यामुळे ही नर्स रुग्णाचा जेवण भरवतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची देशभरात चर्चा

मध्य प्रदेशचे माहिती आयुक्त राहुल सिंग यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो काही क्षणात व्हायरल झाला. नर्सचे रुग्णाप्रति असलेले समर्पण पाहून अनेकांनी देशात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅल्यूट ठोकला आहे. अनेकांनी या महिला नर्सचे अभिनंदन केले असून ती जेवण भरवत असलेली महिला लवकरात लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कमेंट्स करुन लवकरच देश यासंकटातून बाहेर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतीये.

इतर बातम्या :

71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

सेक्स पॉवरसाठी आंध्रात गाढवांवर संक्रांत? मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या घटना उघड !

Video | कोरोनाग्रस्त तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “कोरोनासे नही, इस ‘विदेशी पंखेसे’ डर लगता है साहेब !”

(video of nurse feeding meal to Corona patient goes viral)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें