AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणारे पारंपरिक मेंढपाळ व्यावसायिक बाबुराव मेटकरी यांचा हा मेंढा होता. (Pandharpur Sarja Mendha Goat dies)

71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू
सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू
| Updated on: Apr 30, 2021 | 12:46 PM
Share

पंढरपूर : 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या मेंढ्याचा मृत्यू झाला. मेटकरी कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनिया संसर्गानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. तो अडीच वर्षांचा नर मेंढा होता. (Pandharpur Sarja Mendha Goat worth 71 lakh bid dies of pneumonia)

महाराष्ट्र-कर्नाटकात हिंदकेसरी म्हणून ओळख

सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणारे पारंपरिक मेंढपाळ व्यावसायिक बाबुराव मेटकरी यांचा हा मेंढा होता. माडग्याळ जातीच्या अत्यंत डौलदार सर्जा मेंढ्याला लाखोंची मागणी होती. आटपाडीच्या जत्रेत त्याला 71 लाख रुपयांची बोली लागली होती. सर्जा मेंढाचा माणदेशाची शान आणि भूषण म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंदकेसरी म्हणून तो नावाजला गेला होता.

पोपटाप्रमाणे नाक हेच सौंदर्यस्थळ

अजस्त्र देहयष्टी, देखणं रुप असलेल्या सर्जाचं नाक पोपटाप्रमाणे होतं. हेच त्याचं सौंदर्यस्थळ मानलं जात होतं. सर्जा मेंढा मेटकरी कुटुंबाला वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देत होता. मेटकरींनीही आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच त्याला जीव लावला, सांभाळ केला होता.

दुष्काळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनही आता लाखो रुपये कमवता येऊ शकतात, हे समोर आलं आहे.

निमोनियावरील उपचारादरम्यान मृत्यू

सर्जा मेंढ्याला तीन-चार दिवसांपूर्वी निमोनियाचा संसर्ग झाला होता. आजार बळावल्याने त्याच्यावर पशुवैद्यक डॉक्टरांकडे उपचारही सुरु होते. त्याचा जीव वाचवण्यासाठी मेटकरींनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गुरुवारी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

कलप्पांच्या मेंढ्यालाही साडेआठ लाखांची किंमत

सोलापुरात लाखोंच्या किमतीला विकल्या गेलेल्या मेंढ्यांची आणखीही उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. सोलापुरात मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कलप्पा यांच्याकडे 35 मेंढ्या आहेत. येईल त्या भावाने ते मेंढ्यांची विक्री करतात. त्यांचा विजापुरी जातीचा मेंढा गेल्या वर्षी साठेआठ लाखाला विकला गेला होता. त्यावेळी तो साधारण दीड वर्षांचा होता. त्याचेही नाक पोपटाच्या आकाराचे होते. त्यामुळे त्याची इतकी किंमत आली होती.

संबंधित बातम्या :

केवळ एका खासियतमुळे सोलापूरच्या मेंढ्याला चक्क साडेआठ लाखाची किंमत!

(Pandharpur Sarja Mendha Goat dies)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.