AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कोरोनाग्रस्त तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “कोरोनासे नही, इस ‘विदेशी पंखेसे’ डर लगता है साहेब !”

एका तरुणाला त्यांचे प्राण कोरोनामुळे नाही तर या पंख्यामुळे जाण्याची भीती वाटत आहे. (corona patient fan viral video)

Video | कोरोनाग्रस्त तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतो कोरोनासे नही, इस 'विदेशी पंखेसे' डर लगता है साहेब !
CORONA PATIENT VIRAL VIDEO
| Updated on: Apr 29, 2021 | 11:53 PM
Share

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोज लाखो रुग्ण आढळत असल्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य व्यवस्था तोकडी पडल्यामुळे उपचाराअभावी अनेकांचे प्राण जातायत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मात्र, सध्या एका तरुण कोरोनाग्रस्ताची समस्या सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. या तरुणाच्या बेडवर एक पंखा विचित्र पद्धतीने फिरत असल्यामुळे या तरुणाला त्यांचे प्राण कोरोनामुळे नाही तर या पंख्यामुळे जाण्याची भीती वाटत आहे. या तरुणानेच तसा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (young Corona patient ask hospital management to change fan video goes viral on social media)

विदेशी पंखा पाहून अनेकांना हसू फुटलं

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्ये प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यात एक तरुण रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताना दिसतोय. व्हिडीओमध्ये तो तसे सांगत आहे. त्यांच्या तोंडाला मास्क असून तो त्याच्या बेडच्या ठीक वर एक ‘विदेशी’ पंखा लावल्याचं तो सांगतो आहे. तरुणाने विदेशी पंखा असं म्हटल्यानंतर अनेकांना हा पंखा नेमका कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. मात्र, पुढे हा तरुण आपल्या मोबाईलच्या रेअर कॅमेऱ्याच्या माध्यमातून वर लटकलेला पंखा दाखवतो, तेव्हा अनेकांना हसू आवरलेले नाही. हा पंखा अतिशय विचित्र पद्धतीने फिरताना दिसतोय. अडखळत अडखळत गोल फिरत असल्यामुळे हा पंखा पडतो की काय याची भीती हा व्हिडीओ पाहणाऱ्यालासुद्धा वाटते.

कोरोनासे नही, पंखेसे डर लगता हे साहेब

तरुणाने रुग्णालयातून 17 सेंकदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ काही क्षणात चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हा तरुण मला कोरोनाची नव्हे तर वरच्या पंख्याची भीती वाटतेय असे म्हणतोय. यामध्ये तो सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचे संवाद म्हणून दाखवतोय. तो “कोरोनासे डर नही लगता साहेब, ये विदेशी पंखेसे लगता है,” असं म्हणतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ व्हायरल, पंखा बदलण्याची मागणी

दरम्यान, हा व्हिडीओ लोक एक मजा आणि आनंद म्हणून पाहत आहेत. व्हिडीओतील तरुण कोरोनाग्रस्तानेसुद्धा मिश्किल पद्धतीने पंखा बदलण्याची मागणी केल्यामुळे त्याची वेगळीच चर्चा होत आहे. मात्र, या तरुणाकडे पाहता तो कोरोनाग्रस्त असल्यामुळे त्याची मानसिक स्थिती चांगली राहणं गरजेचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्याच्या बेडवरील पंखा लवकरात लवकर बदलून देण्यात यावा अशी मागणी अनेकांनी केलीये.

इतर बातम्या :

VIDEO | प्रवाशांच्या पळवापळवीने वाद, कोल्हापुरात रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

VIDEO : आनंद महिंद्रांकडून कोरोना महामारीतलं वास्तव दाखवणारा व्हिडीओ शेअर, अनकेजण हळहळले

(young Corona patient ask hospital management to change fan video goes viral on social media)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.