VIDEO | प्रवाशांच्या पळवापळवीने वाद, कोल्हापुरात रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

VIDEO | प्रवाशांच्या पळवापळवीने वाद, कोल्हापुरात रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी
कोल्हापूर फ्री स्टाईल हाणामारी

प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेतून रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. (Kolhapur Rickshaw Drivers Fighting)

अनिश बेंद्रे

|

Apr 28, 2021 | 3:44 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन रिक्षा चालक भर रस्त्यातच एकमेकांना भिडले. प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेतून रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. त्यामुळे रस्त्यातच बघ्यांचीही गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. (Kolhapur Rickshaw Drivers Free Style Fighting)

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हा प्रकार घडला. प्रवासी मिळवण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये होणारी भांडणं नवीन नाहीत. कोल्हापुरातही दोघा रिक्षाचालकांमध्ये असाच वाद रंगताना दिसला. मात्र सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादावादीचं रुपांतर अचानक तुंबळ हाणामारीत झालं.

दोघे रिक्षाचालक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यानंतर काही काळ रिक्षाचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली. मात्र इतर रिक्षाचालक आणि प्रवाशांनी दोघांच्या वादात हस्तक्षेप केला आणि दोघांना दूर केलं. या घटनेचा व्हिडीओ बघ्यांनी कॅमेरात कैद केला होता.

इचलकरंजीत ग्रामस्थ नगराध्यक्षांना भिडला

हातकणंगले नगरपंचायतीच्या दारात वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वी एक ग्रामस्थ संतापला होता. नगरपंचायतीने वाहतुकीची शिस्त का लावली नाही, असा सवाल त्याने थेट नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांना केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. नगराध्यक्ष जानवेकर यांनी त्या ग्रामस्थाच्या कानाखाली आवाज काढल्याने त्या व्यक्तीनेही नगराध्यक्षांची कॉलर पकडून हाणामारी केली होती

पोलीस स्थानकात दोघांमध्ये समेट

तात्काळ इतर ग्रामस्थांनी दोघांनाही बाजूला केले होते. त्यानंतर दोघांनीही हातकणंगले पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. पण दोघांनाही कोठडीची हवा खायला लागेल, असा दम मिळाल्याने दोघेही आपापसात समझोता करुन तक्रार न देताच माघारी फिरले होते.

संबंधित बातम्या :

VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी

VIDEO : एपीएमसी मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी, क्षुल्लक कारणामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण

(Kolhapur Rickshaw Drivers Free Style Fighting)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें