पाऊस लांबला तर लांबू दे, पालघरकरांनो निश्तिच राहा! 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

| Updated on: Jun 06, 2022 | 10:05 AM

पालघर जिल्हामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असायची. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या चांगला पाऊस आणि प्रशासनाने केलेले उत्तम नियोजन यामुळे यंदा नागरिकांना पाणी टंचाईची समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाहीये. विशेष म्हणजे फक्त धरणातील पाणीसाठा नव्हेतर विहिर, बंधारे, बोर यांनाही अद्याप पाणी आहे.

पाऊस लांबला तर लांबू दे, पालघरकरांनो निश्तिच राहा! 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
Image Credit source: dnaindia.com
Follow us on

मुंबई : जून (June) महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, अद्याप राज्यामध्ये पाऊस आलेला नाहीये. अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पावसाची वाट बघितली जातेय. परंतू पालघरकरांना पाणी टंचाईचे अजिबात टेन्शन नाही. कारण धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा अजून शिल्लक आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये जवळपास 42 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने नो टेन्शन आहे. प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले असून यामुळे यंदा पाणी टंचाईची समस्या (Problem) जाणवणार नाही. खास गोष्ट म्हणजे उद्योगांकरिता देखील पुरेसे पाणी असल्यामुळे कपात केली जाणार नसल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वच धरण्यांमध्ये पाणी साठा शिल्लक

पालघर जिल्हामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असायची. मात्र, गेल्या वर्षी झालेला चांगला पाऊस आणि प्रशासनाने केलेले उत्तम नियोजन यामुळे यंदा नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाहीये. विशेष म्हणजे फक्त धरणातील पाणीसाठा नव्हेतर विहिर, बंधारे, बोर यांनाही अद्याप पाणी आहे. परंतू पाणीसाठा जरी शिल्लक असला तरीही पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासानाकडून केले जात आहे. घामणी आणि कवडास ही जिल्ह्यातील दोन सर्वात मोठी धरणे आहेत. त्या दोन धरणांमध्ये साधारण 78 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे हे सर्वात महत्वाचे.

हे सुद्धा वाचा

एमआयडीसीला देखील मिळणार पाणी

घामणी आणि कवडास या धरण्यांचे पाणी वसई, विरार, अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी, अदानी पॉवर यांना दिले जाते. यामुळे नागरिकांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये. प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे नागरिकांना पाणी मिळणार आहे. वांद्री धरणात 57 पाणी साठी शिल्लक आहे तर कुझें धरणामध्ये 62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्याचा वापर सिंचनाकरिता केला जातो. यामुळे या धरण्यांमध्ये पाणी चांगले शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांनी टेन्शन नसणार आहे.