AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यसेविकांच्या आंदोलनाला यश; वेतनात तीन हजार रुपयांची वाढ, इतर मागण्यांबाबत देखील सकारात्मक चर्चा

अखेर आरोग्यसेविकांच्या आंदोलनाला यश आले आहे. त्यांच्या वेतनामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या इतर मागण्यांबाबत देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

आरोग्यसेविकांच्या आंदोलनाला यश; वेतनात तीन हजार रुपयांची वाढ, इतर मागण्यांबाबत देखील सकारात्मक चर्चा
आरोग्यसेविकांच्या वेतनात वाढ Image Credit source: DownToEarth
| Updated on: Jun 06, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई : आरोग्यसेविकांसाठी (Health worker) दिलासादायक बातमी आहे. अखेर मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) आरोग्यसेविकांच्या वेतनात (Salary) वाढ करण्यात आली आहे. या वेतनवाढीचा फायदा मुंबईतील सुमारे चार हजार आरोग्यसेविकांना होणार आहे. आरोग्यसेविकांचे वेतन तीन हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली. आपल्या विविध मागण्यांसाठी आरोग्यसेविकांनी एक जूनपासून आंदोलनाला सुरुवात केली होती. अखेर आंदोनाच्या तिसऱ्या दिवशी वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान वेतन, पेंशन, कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया बंद करणे इत्यादी मागण्यांसाठी आरोग्यसेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले असून, त्यांच्या वेतनात वाढ करण्यााचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

दोन हजारांची वेतनवाढ तात्काळ लागू

किमान वेतन, पेंशन, कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया बंद करणे यासह अनेक मागण्यांसाठी आरोग्यसेविकांनी एक जूनपासून आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेकडून अखेर आरोग्यसेविकांची दखल घेण्यात आली. महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सकारात्मक भूमिका घेत आरोग्यसेविकांच्या वेतनात वाढ केली आहे. आरोग्यसेविकांच्या वेतनात तीन हजारांची वाढ करण्यात आली. त्यातील दोन हजार रुपयांची वेतन वाढ त्यांना तात्काळ लागू करण्यात आली आहे. तर उर्वरित एक हजार रुपयांची वेतनवाढ एप्रिल 2023 पासून देण्यात येणार आहे.

भाऊबीज देण्याची मागणी

दरम्यान 2016 नंतर ज्या आरोग्यसेविकांची नेमणूक झाली त्यांना एक दिवसांचा ब्रेक देण्यात येतो. हा ब्रेक रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील आरोग्यसेविकांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच 2016 पासूनची भाऊबीज मिळावी अशी देखील या आरोग्यसेविकांची मागणी होती. दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याबाबत डिसेंबर 2022 पर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत