पाहुण्यांना ना दारु देणार ना विडी, सातपुड्यातील आदिवासी समाजात एकमताने ठरलं

| Updated on: Mar 30, 2022 | 1:56 PM

घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत असताना खातिरदारी करताना दारू (Alcohol), विड्या, सिगारेट, तंबाखूवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव आदिवासी पावरा समाजाच्या वार्षिक सभेत घेण्यात आला आहे. हा ठराव ऐतिहासिक (Historical) म्हणावा लागेल, कारण धडगाव सारख्या सातपुड्याच्या दुर्गम भागात शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा ठराव पारित झाला आहे.

पाहुण्यांना ना दारु देणार ना विडी, सातपुड्यातील आदिवासी समाजात एकमताने ठरलं
आदिवासी समाजाने घेतले अनेक ऐतिसाहिक निर्णय.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत असताना खातिरदारी करताना दारू (Alcohol), विड्या, सिगारेट, तंबाखूवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव आदिवासी पावरा समाजाच्या वार्षिक सभेत घेण्यात आला आहे. हा ठराव ऐतिहासिक (Historical) म्हणावा लागेल, कारण धडगाव सारख्या सातपुड्याच्या दुर्गम भागात शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा ठराव पारित झाला आहे. आदिवासी समाज आपापल्यापरीने आपली संस्कृती जपून, समाज उन्नत करण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत. याचेच हे ज्वलंत उदाहरण (Example) म्हणावे लागेल.

खातिरदारीमधील दारू, सिगारेट आता बंद

या वार्षिक सभेमध्ये आदिवासी संस्कृती परंपरांमध्ये अनेक आमूलाग्र व सकारात्मक बदल करणारे ठराव पारित करण्यात आले. यात प्रामुख्याने खातिरदारीत दारू, विड्या, सिगारेट, तंबाखूवर बंदी घालण्यात आली आहे. आदिवासी समाजामध्ये कोणी पाहूणा वगैरे घरी आला की, त्याची खातिरदारी केली जात असे यामध्ये दारू, सिगारेट दिली जात असता. मात्र, आता यावर स्वत: आदिवासी समाजानेच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे खरोखरच हा निर्णय काैतुक करण्यासारखा आहे.

आदिवासी समाजाने घेतले अनेक ऐतिहासिक निर्णय

केवळ पूजेसाठी दारू वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. धडगाव तालुक्यातील आदिवासी पावरा समाज विचार मंचातर्फे घेण्यात आलेल्या सहविचार सभेमध्ये असे अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. या सभेत आदिवासी पावरा समाजातील लग्नांमध्ये मुलींना देज देऊन सन्मान करण्यात येतो. ही रक्कम सर्व ठिकाणी 11 हजार 49 रुपये एवढीच समान असावी, नियम मोडल्यास दंड आकारण्यात येईल. तसेच मुलीचे लग्नाचे वय 18 तर मुलाचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय विवाह करण्यात येऊ नये असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Kolhapur VIDEO | लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं