Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या
उष्मघातामुळे बारामती तालुक्यात एकाच दिवशी तीन शेळ्या दगावल्या आहेत.
Image Credit source: TV9 Marathi

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात कडाक्याचे ऊन पडत आहे. या वाढत्या उन्हामुळे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत.यामुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालेच आहे पण उष्मघातामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 30, 2022 | 12:11 PM

बारामती: नवीद पठाण : कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. हे कमी म्हणून की काय आता वाढत्या (Temperature) उन्हामुळेही नुकसानीची मालिका ही सुरुच आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात (Heat Wave) उन्हाचा कडाका असा काय वाढला आहे की, उष्मघातामुळे (Baramati) तालुक्यात तीन शेळ्या एकाच दिवशी दगावल्या आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात कडाक्याचे ऊन पडत आहे. या वाढत्या उन्हामुळे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत.यामुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालेच आहे पण उष्मघातामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. हिवाळ्यात गारठ्यामुळे शेळ्या दगावल्याच्या घटना घडल्या होत्या तर आता वाढत्या उन्हाचा परिणाम समोर येऊ लागला आहे.

उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी

यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेच आहे. उन्हाळ्यात 11 ते 4 या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे चारून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधावे. चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा दिलेला उत्तम. शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी लागणार आहे.

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच उन्हाचा कहर

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाली आहे. दिवस उजाडताच प्रखर ऊन पडत असून नागरिकांच्या अंगाचीही लाहीलाही होत आहे. त्याच प्रमाणे मुक्या प्राण्यांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. बारामतीमध्ये पारा 40 अंश डिग्री सेल्सिअसवर गेला आहे. त्यामुळेच चरण्यासाठी गोठ्यालगत गेलेल्या शेळ्या ह्या उष्मघाताने दगावल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी घटनेचा पंचनामा करुन मदतीची मागणी केली आहे.

पशूसंवर्धन विभागाचाही दुजोरा

उन्हामुळे भर दुपारी एकाच वेळी झारगडवाडी शिवारातील तीन शेळ्या दगावल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यानंतर शेतकरी गोपीनाथ बोरकर यांनी संबंधित घटनेची पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. या तीन शेळ्यांचा मृत्यू हा उष्मघातानेच झाल्याचे पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय उर्वरीत शेळ्यांची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge: हंगामाच्या अंतिम टप्प्यात पेटणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, ऊस फडात अन् कारखान्यांची आवराआवर

Toor Crop : केंद्र सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण, ज्याची भीती शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा..!

Onion Market : कांद्याचे लिलाव बंद, 5 दिवसानंतर काय राहणार चित्र?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें