AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: विजयाचा जल्लोष जीवावर बेतला, राज्यातील 4 शहरांना गालबोट, नेमकं काय घडलं?

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात आला, मात्र सांगली, अकोला, पुणे आणि अमरावतीमध्ये हुल्लडबाजी आणि दगडफेकीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

T20 World Cup 2026: विजयाचा जल्लोष जीवावर बेतला, राज्यातील 4 शहरांना गालबोट, नेमकं काय घडलं?
T20 World Cup 2026 win
| Updated on: Mar 09, 2026 | 12:14 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघाला. मात्र या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सर्वत्र विश्वविजेतेपदाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीमध्ये तणावाच्या घटना समोर आल्या आहेत.

सांगलीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठी दुर्घटना

सांगलीच्या मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. सुरुवातीला शांततेत चाललेल्या या जल्लोषात काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरु केली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

तर दुसरीकडे, सांगली शहरात मारुती चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे एक मोठी दुर्घटना टळली. आतिषबाजीची ठिणगी एका दुकानाच्या छतावर साचलेल्या पालापाचोळ्यावर पडल्याने अचानक आग लागली. मात्र, फायरमन प्रसाद माने आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे मोठी वित्तहानी टळली.

फटाके फोडण्यावरून दोन गटांत वाद

अकोल्यातील हरिहरपेठ भागात परिस्थिती गंभीर बनली होती. टी-20 विश्वचषकातील विजयानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटांत वाद झाला. याचे रूपांतर भीषण दगडफेकीत झाले. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन गट आमनेसामने आल्याने चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात २ ते ३ नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी सध्या कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.

पुण्यात हुल्लडबाजी

पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रोडवर म्हणजेच FC रोडवर तरुणांनी विजयोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी केली. तरुणाईची अलोट गर्दी आणि हुल्लडबाजीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तरुणांना पांगवल्याचे पाहायला मिळाले.

तसेच अमरावती शहरातील राजकमल चौकात काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फेकत जल्लोष केला. या जीवघेण्या प्रकारामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर गर्दी पांगवली. त्यासोबतच धुळे शहरात तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरावर आणि डीजेच्या तालावर नाचत विजयाचा आनंद लुटला. तर भंडाऱ्यातील मुस्लिम लायब्ररी चौकात क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप