AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर… विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट, चर्चांना उधाण

भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे विशेष कौतुक केले. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अहमदाबादमध्ये इतिहास रचला असून धोनीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

T20 World Cup 2026: कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर... विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट, चर्चांना उधाण
Gautam Gambhir Ms Dhoni
| Updated on: Mar 09, 2026 | 8:31 AM
Share

सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. यामुळे भारताने तीन वेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तसेच दोनदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यानंतर आता भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या विजयानंतर काही मिनिटांतच भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा विशाल डोंगर उभा केला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तिघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: धूळ चारली. तसेच सलामीवीरांच्या तुफानी अर्धशतकांमुळे भारताने मोठी मजल मारणं शक्य झाले. भारताने दिलेल्या या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या नाकी नऊ आले. भारताच्या २५५ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम न्यूझीलंडचा डाव १९ व्या षटकात १५९ धावांतच कोलमडला. यात जसप्रीत बुमराहने १५ धावांत ४ विकेट्स न्यूझीलंडचा सुपडा साफ केला. तर अक्षर पटेलने ३ विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर खेळाडूंनी मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. रोहित शर्मा, जय शाह आणि महेंद्रसिंग धोनी यांनी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये बसून या मॅचचा आनंद लुटला. टीम इंडियाच्या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्यात त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे कौतुक केले आहे.

भारतीय टीमने अहमदाबादमध्ये इतिहास रचला! भारतीय क्रिकेट संघ, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुम्हा सर्वांना खेळताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरील हसू खूप छान दिसतेय. तीव्र जिद्द आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य हे एक जबरदस्त समीकरण आहे. खूप छान मित्रांनो, आता या विजयाचा आनंद साजरा करा आणि बुमराहबद्दल काही न लिहिलेलेच बरे… चॅम्पियन गोलंदाज, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने केली.

दरम्यान 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...