AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवतात, आताच बाहेर काढा अन्यथा आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

बऱ्याच लोकांना वाटते की प्रत्येक खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते चांगले राहते, पण तसं अ‍जिबात खरं नाहीये. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्या गुणवत्तेवर, चवीवर आणि पौष्टिक मूल्यावर परिणाम होऊ शकतो. चला कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे हे जाणून घेऊयात.

तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवतात, आताच बाहेर काढा अन्यथा आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 9:03 PM
Share

आजच्या काळात अन्नपदार्थ जास्त दिवस ताजे राहावे यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवल्याने त्यांचा दर्जा टिकून राहतो आणि ते लवकर खराब होत नाहीत. पण आपल्यापैकी अनेक लोकांना असे वाटते की प्रत्येक खाद्यपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे फायदेशीर असते, पण हे अगदीच खरं नसते. कारण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोत आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. तसेच वाढलेल्या आर्द्रतेमुळे किंवा खूप कमी तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे इतर पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. खाद्यपदार्थ योग्य प्रकारे साठवल्यास त्यांचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होते. चला तर मग कोणते खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नयेत, त्यातील संभाव्य धोके आणि फ्रिजमध्ये अन्न ठेवताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

या 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नयेत

बटाटा

बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने कमी तापमानाच्या संर्पकात आल्याने त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर अधिक वेगाने होते. यामुळे बटाट्यांची चव आणि पोत बदलू शकतो. शिवाय बटाटे जास्त तापमानात शिजवल्यास हानिकारक संयुगे तयार होण्याचा धोका वाढू शकतो. बटाटे थंड, कोरड्या आणि जिथे थेट सुर्यप्रकाश येत नाही अशा जागी ठेवणे उत्तम.

कांदा

अख्खे कांदे फ्रिजमध्ये ठेवल्यास आर्द्रतेमुळे ते लवकर मऊ पडू शकतात आणि त्यांना बुरशी लागण्याचा धोका वाढतो. कांदे कोरड्या, हवेशीर जागेत ठेवणे उत्तम. मात्र चिरलेले कांदे हवाबंद डब्यात थोड्या वेळेसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात.

लसूण

फ्रिजमध्ये लसूण ठेवल्याने आर्द्रतेमुळे त्याला कोंब येऊ शकतात किंवा बुरशी लागू शकते. याचा परिणाम त्याच्या चवीवर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो. अख्खा लसूण नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवणे उत्तम असते.

केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची साल लवकर काळपट होऊ शकते आणि थंड तापमानामुळे त्यांच्या नैसर्गिक पिकण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. जर केळे पूर्णपणे पिकलेले नसेल, तर ते खोलीच्या तापमानावर ठेवणे उत्तम. केळं खूप पिकलेले असेल तरच थोड्या काळासाठी फ्रिजमध्ये ठेवता येते.

ब्रेड

ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने तो लवकर कोरडा आणि कडक होऊ शकतो, ज्यामुळे त्याची चव आणि मऊपणा कमी होतो. जर तुम्हाला ब्रेड 2 ते 3 दिवसांत वापरायचा असेल, तर तो एका हवाबंद डब्यात खोलीच्या तापमानावर ठेवा. मात्र जास्त दिवस ठेवण्यासाठी तो फ्रीझरमध्ये ठेवणे हा एक चांगला पर्याय आहे.

फ्रिजमध्ये अन्न ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

अन्न नेहमी स्वच्छ, हवाबंद डब्यांमध्ये ठेवा. गरम पदार्थ थोडे थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा. दूषित होण्याचा धोका कमी करण्यासाठी कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगळे ठेवा.

फ्रिज जास्त भरू नका, कारण त्यामुळे थंड हवेच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो. फ्रिज नियमितपणे स्वच्छ करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी