AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी?, 5 जिल्ह्यात प्रवेशबंदी, थेट NIA..

Sachin Waze Bail Order : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी होणार आहे.

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी?, 5 जिल्ह्यात प्रवेशबंदी, थेट NIA..
Former police officer Sachin Vaze
| Updated on: Sep 30, 2026 | 9:17 AM
Share

देशातील नामंकित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, हा जामीन देताना मोठ्या अटी ठेवण्यात आल्या. पाच जिल्ह्यांमध्ये जाण्यास बंदी आहे. सत्र न्यायालयाकडून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin waze) जामीन मंजूर झाल्याने याप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझे तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या जामिनाला स्थगिती देण्याची NIA ची मागणी आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. अटीशर्तींच्या अधीन राहून विशेष सत्र न्यायालयाने जामीन अर्ज केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त कोर्टाच्या सुनावणीला येण्यासची परवानगी देण्यात आली. त्या व्यतिरिक्त या जिल्ह्यात प्रवेश बंदी असणार आहे.

कोर्टाच्या अटीशर्तींनुसार, सचिन वाझेला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये राहत येणार नाही किंवा प्रवेश करता येणार नाही. फक्त कोर्टाच्या सुनावणीसाठी येण्याची परवानगी आहे, त्याशिवाय नाही. यामुळे आता सचिन वाझेचा मुक्काम पुण्यात असणार आहे. सचिन वाझेची आज सुटका होईल. त्यानंतर थेट पुण्याला रवाने व्हावे लागेल.

जामीन मिळणे म्हणजे निर्दोष मुक्तता नाही. पुराव्यांची अंतिम तपासणी पुढे होणार आहे, असे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.  न्यायालयाने 1 लाखांचा वैयक्तिक बॉन्ड आणि 1 स्थानिक जामीदाराची अट ठेवली आहे. न्यायालयाने जामीन देताना सचिन वाझे याला पासपोर्ट असल्यास तो NIA कडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सचिन वाझे याला जामीन आदेशानंतर सात दिवसात मुंबईच्या बाहेर राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता देण्याचा आदेश दिला. त्यात पुण्याला राहणार असल्याचे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, UAPA अंतर्गत दहशतवादी कृत्य केल्याचे दिसून येत नाहीये. एनआयएने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात नक्की काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली; अमित शाह यांचं भावुक विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...