AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आता CJP चं पुन्हा सर्वात मोठं आंदोलन, अभिजीत दीपकेंची थेट घोषणा; देशात आता नवं वादळ!

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारला इशारा दिला आहे. "विद्यार्थ्यांना दिलेलं आश्वासन सरकारने मोडलं, तर देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही," असं दास म्हणाले आहेत.

...आता CJP चं पुन्हा सर्वात मोठं आंदोलन, अभिजीत दीपकेंची थेट घोषणा; देशात आता नवं वादळ!
cjp and abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 9:02 PM
Share

CJP Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील आंदोलन सध्या संपलेले आहे. परंतु या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या देशभरातील तरुणांवर कारवाई केली जात आहे. याच कारवाईला सीजेपीने कठोर विरोध चालू केला आहे. सरकारने सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन पाळले जात नाहीये, असा आरोप सीजेपीने केला आहे. असे असतानाच आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर दीपके यांनी आम्ही पुन्हा आंदोलन करू, असं म्हटलंय.

सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत…

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्या मतानुसार सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार तपास चालूच ठेवावा, असे या आदेशात म्हणण्यात आले आहे. याच अंतरिम आदेशानंतर सीजेपीने असमाधन व्यक्त करत पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

कॉकरोच जनता पार्टी लवकरच देशभरात…

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर कॉकरोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्याविरोधातील कारवाई तात्काळ थांबवावी.”

सरकारने काय आश्वासन दिले होते?

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारला इशारा दिला आहे. “विद्यार्थ्यांना दिलेलं आश्वासन सरकारने मोडलं, तर देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही,” असं दास म्हणाले आहेत. सीजेपीच्या मते, सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आदेश केंद्र सरकारने 25 जुलै 2026 रोजी देशातील युवकांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात आहे. त्यावेळी सर्व एफआयआर मागे घेण्यात येतील आणि आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाणार नाही, अशी हमी सरकारने दिली होती. दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या इशाऱ्यानंतर सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप