AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Market : कांद्याचे लिलाव बंद, 5 दिवसानंतर काय राहणार चित्र?

उन्हाळी कांद्याचे घटते दर आणि वाढती आवक यामुळे काढलेल्या कांदा थेट बाजारपेठेत घेऊन जाण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. कांदा हा नाशवंत आहे. यातच वाढत्या उन्हामुळे लवकर खराब होतो. यामुळे दर कमी असतानाही शेतकऱ्यांनी कांदा विक्रीवर भर दिला आहे. पण आता शेतकऱ्यांना 5 दिवस कांदाच विकता येणार नाही. कारण मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितसह जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत.

Onion Market : कांद्याचे लिलाव बंद, 5 दिवसानंतर काय राहणार चित्र?
लासलगाव बाजार समितीमधील व्यवहार सलग पाच दिवस बंद राहणार असल्याने मंगळवारी कांद्याची मोठी आवक झाली होती.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 9:56 AM
Share

लासलगाव:  (Summer Onion) उन्हाळी कांद्याचे घटते दर आणि वाढती आवक यामुळे काढलेल्या कांदा थेट बाजारपेठेत घेऊन जाण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. कांदा हा नाशवंत आहे. यातच वाढत्या उन्हामुळे लवकर खराब होतो. यामुळे दर कमी असतानाही शेतकऱ्यांनी (Onion) कांदा विक्रीवर भर दिला आहे. पण आता शेतकऱ्यांना 5 दिवस कांदाच विकता येणार नाही. कारण मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे (Lasalgaon Market) लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितसह जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. कांद्याबरोबरच धान्याचेही व्यवहार बंद असल्याने कोट्यावधींची उलाढाल ही ठप्प राहणार आहे. सध्या उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होती. पण आता सलग पाच दिवस शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

5 दिवसानंतर काय राहणार चित्र

गेल्या महिनाभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. यापूर्वी खरिपातील लाल कांद्याची आवक सुरु असताना कांद्याला मागणीही आणि दरही चांगला होता. मात्र, आता उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाली आहे. 3 हजार रुपये क्विंटल असणारा कांदा थेट 1 हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव या मुख्य बाजार समित्यांमध्ये अशीच अवस्था आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1 हजार तर सर्वसाधारण दर हा 800 रुपयांपर्यंत आहे. शिवाय आता सलग 5 दिवस लिलाव बंद राहूनही दरावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण मुळात मागणीतच घट आहे. त्यामुळे दर वाढतील असे नाही पण बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या कांद्याचे नियोजन करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला वेळ मिळणार आहे.

दुष्काळात तेरावा

मार्च महिना संपुष्टात येत असून कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण 800 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत असताना आता दुष्काळात तेरावा महिना अशी परस्थिती निर्माण झाली आहे. मार्च एंडिंगच्या, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसा मिळणार नसल्याने लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहेत.

कोट्यावधीची उलाढाल ठप्प

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्या कांद्यासाठी प्रसिध्द आहेत. दिवसाकाठी 400 ते 500 वाहनांतून कांदा या बाजार समित्यांमध्ये दाखल होतो. जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहणार आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक होत असताना या बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे कोट्यावधींची उलाढालीवर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या :

Nanded: नुकसान खरिपाचे भरपाई रब्बीत, पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी गोड बातमी..!

Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार ‘एंट्री’, केशरच्या मागणीतही वाढ

Central Government: पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी, केंद्र सरकारचा काय आहे Mega plan?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.