भिवंडीकरांनो…पाणी जपून वापरा, 2 दिवस शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद!

| Updated on: Jun 08, 2022 | 11:02 AM

भिवंडी येथील महापालिका स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे देखभाल आणि दुरुस्ती काम पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. यामुळे भिवंडीमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आता दोन एक दिवसांमध्ये पावसाळ्याला सुरूवात होईल. यावेळी जलवाहिन्यांचे काम करणे प्रशासनाला शक्य होणार नसल्यामुळे पावसाच्या पूर्वीच हे काम करून घेतले जात आहे.

भिवंडीकरांनो...पाणी जपून वापरा, 2 दिवस शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Image Credit source: mumbailive.com
Follow us on

मुंबई : यंदा राज्यामध्ये 4 जूनला मान्सूम (Monsoon) दाखल होणार होता. मात्र, अद्याप मान्सूमचा पत्ता नाही. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे अजून तरी राज्यामध्ये (State) पाणी टंचाई निर्माण झाली नाहीये. हवामान विभागाकडून सांगितले जात आहे की, 10 तारखेपर्यंत पाऊस येईल. मात्र धरण्यांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात असूनही भिवंडीकरांना पुढील दोन दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. आजपासून ते उद्यापर्यंत संपूर्ण भिवंडीमध्ये (Bhiwandi) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे चांगलेच हाल होणार हे नक्की.

दोन दिवस भिवंडीमधील पाणीपुरवठा बंद

भिवंडी येथील महापालिका स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे देखभाल आणि दुरुस्ती काम पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. यामुळे भिवंडीमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आता दोन एक दिवसांमध्ये पावसाळ्याला सुरूवात होईल. यावेळी जलवाहिन्यांचे काम करणे प्रशासनाला शक्य होणार नसल्यामुळे पावसाच्या पूर्वीच हे काम करून घेतले जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना याबद्दल अगोदरच माहिती देण्यात आलीये. जेणेकरून नागरिक दोन दिवसांच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करू शकतील.

हे सुद्धा वाचा

नागरिकांकडून संताप व्यक्त

प्राधिकरणाच्या पाईपलाईनची सर्व कामे जसे की तपासणी आणि देखभाल दुरूस्ती तातडीने केली जातेय. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा खंडीत केला जाईल. इतकेच नाहीतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबानेच पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे नागरिकांनी मुबलक प्रमाणात पाणीसाठी करून ठेवा असे आवाहन पालिकेचे कार्यकारी अभियंता एल. पी. गायकवाड यांनी केले आहे. मात्र, पावसाळा दोनच दिवसांवर असताना इतक्या उशीरा पाईपलाईनचे काम सुरू केल्याने नागरिक संपात व्यक्त करत आहेत. उन्हाळ्यामध्ये पालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.