Wolf Attacked | सांगलीत लांडग्याची प्रचंड दहशत! 17 शेळ्या केल्या फस्त, 2 गंभीर जखमी

| Updated on: Dec 17, 2021 | 9:46 PM

रात्रीची वेळ असल्यानं लांडग्यांना हुसकावून लावण्याच स्थानिक शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा त्यांनी मोबाईलच्या टॉर्चने पाहणी केली, तेव्हा त्यांना 17 शेळ्या ठार झाल्याची दिसलं. तर दोन शेळ्या जखमी झाल्या होत्या.

Wolf Attacked | सांगलीत लांडग्याची प्रचंड दहशत! 17 शेळ्या केल्या फस्त, 2 गंभीर जखमी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सांगली : सांगली (Sangli) जिल्यात लांगड्यांची प्रचंड दहशत पाहायला मिळतेय. लांडग्यानं (Wolf) केलेल्या हलल्यात तब्बल 17 शेळी दगावल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तर दोन शेळ्या (Goat) गंभीर जखमी आहेत. या घटनेची वनविभागानंही गंभीर दखल घेत घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे.

सांगलीत नेमकं कुठं?

सांगली जिल्यातील मिरज तालुक्यात तुंग (Tung Village) नावाचं गाव आहे. या गावात शेतात वस्तीला असलेल्या मेंढ्यांवर लांडग्यानं हल्ला केला. या हलल्यात लांडग्यानं एक रात्रीत तब्बल 17 शेळ्यांची शिकार केली. या हल्ल्यात दोन शेळ्या जखमीही झाल्या असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी शेळ्यांवर उपचारही केले आहेत. या घटनेमुळे तुंग गावात एकच खळबळ उडाली असून लांगड्यांमुळे या भागातील लोक भयभीत झालेत.

शेतकरी हवालदिल

तुंग गावात ऊसाच्या शेतात गेल्या तीन दिवसांपासून तब्बल अडीचशे शेळ्या आणि मेढ्यांचा कळप बसवण्यात आला होता. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन लांडग्यांनी या कळपावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर शेळ्या-मेंढ्यांचा कळप जिवाच्या आकांतानं ओरडू लागल्या. त्यानंतर वस्तीवर असलेल्या गजानन आरगे, शितल आगे, प्रकाश भानुसे यांनी हल्ला चढवलेल्या लांडग्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण जनावरांनी त्यांवरही हल्ला चढवला. अखेर धाडस दाखवत लांगड्यांना हुसकावून लावण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत लांडग्यांनी 17 शेळ्यांची शिकार केली होती.

 

अंधारामुळे अडचणी वाढल्या

रात्रीची वेळ असल्यानं लांडग्यांना हुसकावून लावण्याच स्थानिक शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा त्यांनी मोबाईलच्या टॉर्चने पाहणी केली, तेव्हा त्यांना 17 शेळ्या ठार झाल्याची दिसलं. तर दोन शेळ्या जखमी झाल्या होत्या. शेळ्या दावणीला बांधलेल्या असल्यानं त्यांना लांडग्यांच्या हल्ल्यापासून स्वःताचा बचाव करता आला नाही आणि पळून जाणंही शक्य झालं नाही. लांडग्यानं केलेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळाचं तब्बल 2 लाख 50 हजाराचं नुकसान झालंय.

या घटनेची वनविभागानंही गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळाला भेट देऊन वनविभागानं पंचनामाही केलाय. तसंच जखमी शेळ्यांवर उपचारही करण्यात आले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे आता लांगड्यांच्या हल्ल्यापासून शेळ्या-मेढ्यांना सुरक्षित कसं ठेवायचं, असा प्रश्ना स्थानिक मेंढपाळांना सतावतो आहे. यावर काहीतरी तातडीनं उपया शोधून लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची गरज स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.

 

संबंधित बातम्या –

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; पोलिसांच्या नाशिकमध्ये दोघांना बेड्या

क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला