राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; पोलिसांच्या नाशिकमध्ये दोघांना बेड्या

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या दोघांना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मुद्देमालासह शिकारीसाठी वापरलेली हत्यारे  ताब्यात घेतली आहेत.

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार; पोलिसांच्या नाशिकमध्ये दोघांना बेड्या
नांदगावमध्ये मोराची शिकार करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 4:28 PM

नाशिकः राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या दोघांना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मुद्देमालासह शिकारीसाठी वापरलेली हत्यारे  ताब्यात घेतली आहेत.

राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणाऱ्या दोघा संशयितांना पोलीस व वनविभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नाशिकच्या नांदगावात ताब्यात घेण्यात आले. पोलीस व वनविभाग यांची रात्रीची गस्त सुरू असताना नाशिकच्या मनमाड जवळील भार्डी व धनेर गावाजवळ संशयीतरित्या फिरत असलेल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर मृतावस्थेत आढळून आला. मोराच्या मानेला गोळी लागलेली असून, त्याची मान कापलेल्या अवस्थेत होती. दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच या संशयितांनी मोरांची शिकार केल्याचे कबूल केले. मुद्स्सीर अहेमद अकिल अहेमद, जाहिद अक्तर सईद अहेमद (रा. मालेगाव) या दोघा संशयितांकडून एक मृतावस्थेतील मोर पक्षी, लोखंडी बॅरेल असलेली बंदूक, बुलेट्सची डबी ( गोळ्या ) कोयता, सुरा, लायटर, विद्युत टेस्टर, कटर, सर्च लाईट,ऑईल बॉटल आदी शिकार करण्याचे साहित्य मिळाले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे संशयित सऱ्हाईत गुन्हेगार आहेत. काळवीट शिकार प्रकरणी त्यांच्यावर नाशिकच्या मालेगाव, नांदगाव, येवला तालुक्यातील वनविभागाकडे गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र कार्यालय, नांदगांव करीत आहे.

मोर संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारीचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आरोपी रात्रीच्या वेळी मोराची शिकार करतात. कोणालाही थांगपत्ता लागू न देता, रात्रीच्या रात्रीतून विक्रीही केली जाते. आजही अनेकजण कोंबड्याप्रमाणे मोराचे मांस खायला पसंदी देतात. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. लोकांनी स्वतःहून पुढाकार घेत मोर संवर्धनाचा विडा उचलल्यास असे प्रकार मात्र नक्कीच टाळले जाऊ शकतात. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडून इतरही शिकारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्याः

क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता; बोगस प्रमाणपत्र प्रकरणानंतर निर्णय, पुण्यात उभारणार ऑलिम्पिक भवन गडकरी साहेब आम्ही नशिबवान, तुमची वाट पहात असतो, मंत्री भारती पवारांच्या भाषणानं नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या

महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत जळगावमध्ये वीजपुरवठा केला सुरळीत!

(National bird peacock hunting; Two arrested by police)

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.