क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता; बोगस प्रमाणपत्र प्रकरणानंतर निर्णय, पुण्यात उभारणार ऑलिम्पिक भवन

बोगस क्रीडा प्रमाणपत्रासारखे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता; बोगस प्रमाणपत्र प्रकरणानंतर निर्णय, पुण्यात उभारणार ऑलिम्पिक भवन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 2:29 PM

नाशिकः बोगस क्रीडा प्रमाणपत्रासारखे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांनी दिली.

शिरगावकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये 83 व्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिरगावरकर म्हणाले, बोगस प्रमाणपत्र प्रकरणामुळे क्रीडा संघटनेची काळी बाजू समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंचे खूप नुकसान झाले. असे प्रकार घडू नये यासाठीच क्रीडा क्षेत्रासाठीही आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी अशोक दुधारेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा तलवारबाजी संघटनेचा निर्णय आहे. दुधारेच्या नावावर कोणीही आक्षेप घेतला नसेल. त्यामुळे हे नाव अंतिम झाले असेल, अशी शक्यताही शिरगावकर यांनी व्यक्त केली. शिरगावकर म्हणाले, पुण्यात ऑलिम्पिक भवनची निर्मिती केली जाणार आहे. राज्यातले खेळाडू, संघटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजवर अनेकांना बेड्या

नाशिकच्या जिल्हा संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळविलेल्या तोतया खेळाडूला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रभाकर धोंडिबा गाडेकर असे त्या भामट्याचे नाव आहे. शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी अनेकजण गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या प्रभाकर गाडेकरने सेपकटकरा खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. या प्रमाणपत्राच्या जोरावर त्याने अहमदनगरच्या शासकीय कोषागारामध्ये 2019 मध्ये नोकरी मिळवली होती. त्याला पुण्यातील हिंडवडी येथे अटक करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्येही चौघे अटकेत

बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटमधील चौघांना नुकत्याच औरंगाबादमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ट्रंपोलिन आणि टंबलिंन या खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याचे प्रमाणपत्र या चौघांनी दिले होते. आरोपींमध्ये क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर, निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रेय महादवाड, पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून शंकर श्यामराव पतंगे आणि एजंट अंकुश प्रल्हाद राठोड यांचा समावेश आहे.

बोगस रहिवासी दाखवले

औरंगााबादमध्ये अटक केलेले राठोड आणि पतंगे क्रीडा संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या मैत्री निर्माण झाली होती. त्यांची महादवाड आणि वीर यांच्यासोबतही मैत्री होती. यातल्या राठोड आणि पतंगेने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्राबाहेरील तरुणांना पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी या तरुणांना औरंगाबादचे रहिवासी असल्याचे दाखविण्यात आले आहे.

राज्यभर रॅकेट सक्रिय

औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या चौकडीने राज्यभरातील अनेकांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याची शक्यता आहे. त्या तरुणांनी सरकारी नोकरीच्या आशेपायी ही उठाठेव केली. त्यासाठी हजारो रुपये मोजले. आता एकेक प्रकरण बाहेर निघत आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आता अटकेतील आरोपींकडून कुणाकुणाला बोगस प्रमाणपत्र दिले याची नावे मिळाली, तर त्या प्रमाणपत्राचा कोणी, कुठे आणि कसा वापर केला हे उघडकीस येऊ शकते.

इतर बातम्याः

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

सिन्नरमध्ये पुन्हा 207 कोरोना रुग्ण; निफाडही हॉटस्पॉट, नाशिक जिल्ह्यात 973 जणांवर उपचार सुरू

(Code of Conduct for the Sports Sector; Decision after bogus certificate case, Olympic building to be constructed in Pune)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.