Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

खरे तर गडकरी कुठेही धूमधडाक्यात येतात. शरद पवार असो की, उद्धव ठाकरे. दोघेही त्यांच्यावर बेहद खूश असतात. आता नाशिकचा दौरा काय, तर थीम पार्कचे उद्घाटन. मात्र, गडकरींनी तो पु्न्हा एकदा आपल्या स्टाइलने गाजवला.

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 1:27 PM

मनोज कुलकर्णी, नाशिकः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण म्हटले की, तुफान बॅटींग हे समीकरण ठरलेले असते. त्यात चक्क महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निघालेला नाशिक दौरा, तरी कसा अपवाद राहील. या दौऱ्यात तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवणाऱ्या गडकरींनी आकाशवाणीची अशी मंजुळ धून छेडली की, राजकीय पदाधिकाऱ्यांनी माना डोलावल्या.

खरे तर गडकरी कुठेही धूमधडाक्यात येतात. शरद पवार असो की, उद्धव ठाकरे. दोघेही त्यांच्यावर बेहद खूश असतात. आता नाशिकचा दौरा काय, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे उद्घाटन. मात्र, गडकरींनी तो पुन्हा एकदा आपल्या स्टाइलने गाजवला. त्याचा त्यात घोषणा होती. म्हणावे, तर नाशिकचे कौतुक होते आणि शालीतून दिलेले उपदेशाचे डोसही. या कॉर्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले असे दिग्गज उपस्थित होते. गडकरींना या सगळ्यांपुढे तीन ‘ई’चे तत्त्व मांडले. ते म्हणजे ईथिक्स, इकोनॉमी, इकोलॉजी. नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरणशास्त्र. या तिन्हीची सांगड घालून केलेले काम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यासाठी येणाऱ्या काळात ध्वनीप्रदूषणावर काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. असेच काम नाशिकमध्ये झाले, तर नाशिकमधल्या डॉक्टरांची प्रॅक्टीस अर्ध्यावर येईल. कारण लोकच आजारी पडणार नाही, असा आशावादही व्यक्त केला. येणाऱ्या काळात वाहनांना मंजुळ अशा भारतीय वाद्यांचे हॉर्न बसवू. त्यासाठी जुन्या पर्यावरण कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सांगितले. नागपुरात सध्या त्यांनी सर्व तज्ज्ञांची मोट बांधून त्यांना ध्वनी, वायू, जल प्रदूषणावर अभ्यास करायला सांगितला आहे. सर्व खासदार, महापौर, आमदारांनी असे काही केले, तर आपला देश प्रदूषणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवाय जसे अगदी स्वतःपासून सर्वांचे लाल दिवे काढून घेतले, तसे या घोषणेबाबतही करण्याचा निश्चय व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यावरील हॉर्न बदलू. आकाशवाणीसारखी धून या गाड्यांना चालेल का, याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

योगासनांचा कानमंत्र

गडकरींनी महानायक अमिताभ बच्चनचा यावेळी उल्लेख केला. त्यांनी सकाळी-सकाळी रंगलेला संवाद सांगितला. अमिताभ म्हणाला, गडकरीजी तुम्ही दहा वर्षांनी तरुण दिसताय. तेव्हा त्यावर गडकरी म्हणाले, कोरोनाने तरुण केले. कोरोना झाल्यानंतर रोज एक तास फिरतो. योगासने करतो. त्यामुळे आपली प्रकृती ठणठणीत राहिली आहे. तुम्ही योगासने, व्यायाम करा. योगा करायला भव्य असा थीमपार्क उपलब्ध झाला आहे. त्याचा लाभ घ्या. आरोग्य नक्की सुधारेल, असा सल्ला देताना नाशिकचे भरभरून कौतुक केले. नाशिकचे हवामान, गोदावरी, अभ्यासिका, पार्किंग उत्तम असल्याची मोहोर उमटवली. हे शहर असेच सुंदर ठेवा, बकाल होऊ देऊ नका, असा सल्लाही दिला. विशेष म्हणजे सध्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील रस्त्यांचा प्रश्न गाजतोय. सत्ताधारी भाजपला त्यांच्या पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारीही घरचा आहेर देत आहेत. ही फक्त वाचता-वाचता आठवण म्हणून वाचकांनी लक्षात ठेवावे.

गायीच्या शेणापासून पेंट

गडकरी भाषणात म्हणाले, आम्ही गायीच्या शेणापासून पेंट तयार करून वापरतो. त्यामुळे अर्ध्या किमतीत उत्तम दर्जाचा रंग मिळतो. शेतात ट्रॅक्टर बायोडिझेलवर चालवतो. बायोडिझेलची निर्मिती उसाच्या मळीपासून होते. त्यामुळे वर्षाला सव्वालाख वाचतात. नागपूरला सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जर सीएनजीवर केल्या, तर 75 लाख वाचतील. नागपूरचे पाणी आम्ही वीज निर्मितीला देतो. त्यातून वर्षाला 300 कोटींचे उत्पन्न होते. हे साधे पर्याय आहेत. सगळ्यांनी सगळीकडे वापरले, तर खूप काही होऊ शकते. एकंदर गडकरींनी नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आलेली असताना एका दगडात अनेक पक्षी मारले. पहिले थीमपार्कचे उद्घाटन केले. दुसरे, नाशिक कसे सुंदर आहे म्हणून भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे सध्या महापालिकेच्या सत्तेत भाजपच आहे. तिसरे, संघाच्या मुशीतले संस्कार त्यांच्या भाषणातून दिसले. त्यातून जास्तीत जास्त भारतीय गोष्टींचा वापर यावर त्यांनी भर दिला. मग तो योगासनांचा धडा असो, हॉर्नसाठी भारतीय वाद्यांची सक्ती असो, उसाच्या मळीपासून बायोडिझेल निर्मिती असो की, गायीच्या शेणापासून पेंट. गडकरींनी मांडलेला हा राजकीय देशीवाद (नेमाडेंच्या देशीवादाशी याचा काडीचाही संबंध नाही) ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला किती बळ देतो, हे येणारा काळच ठरवेल.

इतर बातम्याः

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

घातवारः बारा वर्षांच्या मुलासह दोन तरुण गोदावरीत बुडाले; नाशिकमधल्या घटनेने हळहळ

सिन्नरमध्ये पुन्हा 207 कोरोना रुग्ण; निफाडही हॉटस्पॉट, नाशिक जिल्ह्यात 973 जणांवर उपचार सुरू

(Union Minister and BJP leader Nitin Gadkari and his patriotism)

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.