AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. जर घरातील एखाद्या वस्तुची दिशा चुकली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते अशी मान्यता आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
balconyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 8:58 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या सोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर तो केवळ तुमच्या नशीबाचा दोष नसतो, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. अनेकदा आपण दररोज अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे आपण संकटात सापडू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो, त्यामुळे घराची सजावट करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

बाल्कनीची सजावट करताना काय काळजी घ्यावी?

वास्तुशास्त्रामध्ये जसं तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम याचं महत्त्व असतं, तेवढंच तुमच्या घराच्या बाल्कनीचं देखील महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा नवीन घर घेता तेव्हा बाल्कनीची दिशा कोणती आहे, ते पाहूनच घर घ्यावं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची बाल्कनी ही शक्यतो पूर्व दिशेलाच असावी. जर पूर्व दिशेला नसेल तर पश्चिम दिशेला असली तरी चालेल पण घराची बाल्कनी ही कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बाल्कनीची सजावट करताना तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असे काही झाडं ठेवू शकतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जसं की तुळस, शमी या सारखी झाडं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकतात. तसेच फुलांची झाडं देखील लावू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी शक्यतो बाल्कनीत काटेरी झाडं लावणं टाळावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही बाल्कनीमध्ये काटेरी झाडं लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वादव विवाद होतात, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...