AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी, सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच

सोनीने जागतिक स्तरावर RX10 V कॅमेरा लाँच केला आहे. यामध्ये 20.1MP एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर, बायॉन्झ एक्सआर प्रोसेसर, 24-600mm झाईस लेन्स आणि 25x ऑप्टिकल झूम आहे. चला तर मग या कॅमेऱ्याची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी, सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच
RX10 V CameraImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 10:47 PM
Share

बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत त्यांचा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, RX10 V कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीच्या मते या पाचव्या पिढीच्या मॉडेलमध्ये 25x ऑप्टिकल झूमसह ZEISS Vario-Sonnar T 24-600mm F2.4-4.0 लेन्स आहे. यात 1.0-टाइप स्टॅक्ड एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर असून, तो सोनीच्या स्वतःच्या BIONZ XR इमेज प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

सोनीने कॅमेऱ्यामध्ये रिअल-टाइम रेकग्निशन ऑटोफोकससाठी एआय प्रोसेसिंग युनिटदेखील दिले आहे. हा कॅमेरा 4K 120fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. चला तर मग या कॅमेऱ्याची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

सोनी RX10 V ची किंमत

सोनी RX10 V ची किंमत युरोपियन युनियनमध्ये 2,499 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे 2 लाख 72 हजार रुपये इतकी किंमत आहे आणि यूकेमध्ये 2,199 पाउंड म्हणजे अंदाजे 2 लाख 81 हजार रुपये इतकी आहे. प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. कंपनीने अद्याप भारतातील किंमत किंवा उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

सोनी RX10 V ची वैशिष्ट्ये

सोनी RX10 V मध्ये 20.1-मेगापिक्सेलचा 1.0-टाइप स्टॅक्ड एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर असून, तो बायॉन्झ एक्सआर इमेज प्रोसेसिंग इंजिनद्वारे समर्थित आहे. कंपनीने यामध्ये 24-600mm समतुल्य फोकल रेंज, 25x ऑप्टिकल झूम आणि f2.4 ते f4.0 ॲपर्चर असलेली एक फिक्स्ड झाईस व्हेरियो-सोनार टी लेन्स समाविष्ट केली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा कॅमेरा वाइड-अँगलमध्ये 3 सेमी पासून ते टेलिफोटोमध्ये 72 सेमी पर्यंत मॅक्रो फोटोग्राफीला सपोर्ट करतो.

फेज-डिटेक्शन ऑटोफोकस

या कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यामध्ये एक इंटीग्रेटेड AI प्रोसेसिंग युनिट आहे, जे रिअल-टाइम रेकग्निशन ऑटोफोकस (AF) सक्षम करते, ज्यामुळे माणसं, प्राणी, पक्षी, कीटक, कार, ट्रेन आणि विमाने ओळखू व ट्रॅक करू शकता. याव्यतिरिक्त बिल्ट इन ऑटो रेकग्निशन मोड आणि ह्युमन पोज एस्टिमेशन तंत्रज्ञान सुधारित सब्जेक्ट ट्रॅकिंग प्रदान करतात. एकूणच सोनी RX10V मध्ये 575 पर्यंत फेज-डिटेक्शन ऑटोफोकस पॉइंट्स आहेत आणि तो सतत AF/AE ट्रॅकिंगसह 30fps पर्यंतच्या ब्लॅकआउट बर्स्ट स्पीडने शूट करू शकतो.

कॅमेरा स्लो-मोशन प्लेबॅकला सपोर्ट करतो

व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, हा कॅमेरा 120fps पर्यंत 4K रेकॉर्डिंग आणि 5x पर्यंत स्लो-मोशन प्लेबॅकला सपोर्ट करतो. यात 10-बिट 4:2:2 रेकॉर्डिंग, एस-सिनेटोन, एस-लॉग3, ॲक्टिव्ह मोड इमेज स्टॅबिलायझेशन, युझर-इम्पोर्टेड LUT सपोर्ट, ऑटो फ्रेमिंग, टाइम-लॅप्स आणि स्टिल एक्स्ट्रॅक्शनसाठी शॉट मार्क यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. ऑडिओसाठी यात सोनीच्या मल्टी इंटरफेस शूचा वापर केला जातो, जो सुसंगत डिजिटल मायक्रोफोनसोबत काम करतो.

सोनी RX10 V मध्ये 3.68 दशलक्ष डॉट्स आणि 0.78x अ‍ॅपर्चर असलेला 0.5-इंचाचा क्वाड-VGA OLED इलेक्ट्रॉनिक व्ह्यूफाइंडर, तसेच 1.62 दशलक्ष डॉट्स असलेली 3.0-इंचाची टिल्टिंग LCD टचस्क्रीन आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?