मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सरकारच्या या निर्णयावर स्थगितीची मागणी केली आहे. या सक्तीमुळे मुंबईतील तब्बल साडेनऊ लाख रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे हजारो चालकांच्या […]
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सरकारच्या या निर्णयावर स्थगितीची मागणी केली आहे. या सक्तीमुळे मुंबईतील तब्बल साडेनऊ लाख रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे हजारो चालकांच्या नोकरीवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. याचिकेत म्हटले आहे की, अनेक चालकांना मराठी भाषा येत नाही आणि या नव्या नियमामुळे त्यांना व्यवसाय करणे कठीण होईल. यापूर्वी, राज्यात सार्वजनिक ठिकाणी मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे, आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीही मराठी भाषेची सक्ती केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालय लवकरच या जनहित याचिकेवर सुनावणी करेल अशी अपेक्षा
Published on: Aug 25, 2026 07:07 PM
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला

