AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

पालघरच्या मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील तब्बल 35 विद्यार्थ्यांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहे.

आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
palghar 35 Student fever newsImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 26, 2026 | 12:04 AM
Share

पालघरच्या मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीदरम्यान तब्बल 35 विद्यार्थ्यांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजारी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 30 विद्यार्थी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर 5 विद्यार्थी मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदमयांनी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत, तर उर्वरित तीन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या सर्व 30 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय पथके तैनात

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथके मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात तैनात करण्यात आली आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात असून, आजारी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, 35 विद्यार्थ्यांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याने यामागील नेमके कारण काय, याकडेही प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ