AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप

Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप

| Updated on: Oct 11, 2026 | 12:28 PM
Share

युट्यूबर ध्रुव राठी यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केला आहे की, १५ ते २० अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांना २२ ते २३ तास कुणासोबतही संपर्क साधू दिला नाही. घरात घुसून त्यांच्या आई-वडिलांसोबतही झटापट केल्याचा दावा ध्रुव राठी यांनी केला आहे.

युट्यूबर ध्रुव राठी यांनी ट्वीटद्वारे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, १५ ते २० अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांना २२ ते २३ तास कोणत्याही संपर्काविना ठेवण्यात आले होते. ध्रुव राठी यांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आई-वडिलांसोबत झटापट करण्यात आली. राठी यांच्या दाव्यानुसार, अज्ञातांनी घरात अचानक प्रवेश केला आणि त्यांना बेडरूममधून फरफटत बाहेर काढले. या प्रक्रियेत त्यांना दुखापत झाली असून, शरीरावर जखमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी हे अपहरण असून कोणतीही अटक किंवा स्थानबद्धता नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला चप्पल घालण्याचीही संधी न देता जीपमध्ये बंद करून ठेवण्यात आले, असे राठी यांनी नमूद केले. या २२-२३ तासांच्या कालावधीत त्यांना फोन वापरण्याची किंवा कोणत्याही वकिलाशी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांनी आपल्याबाबत पसरवल्या गेलेल्या अफवांबद्दल स्पष्टीकरण देत आपण एक भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे.

Published on: Oct 11, 2026 12:28 PM

Follow Us