AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brezza-Nexon मोठी स्पर्धा! येत आहे महिंद्राची CNG एसयूव्ही, या तारखेला लाँच होणार

महिंद्राच्या XUV 3XO CNG च्या टेस्टींगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या टेस्टींगचा एक व्हिडीओ व्लॉगरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामुळे या सुव्हची काही माहिती उघड झाली आहे.

Brezza-Nexon मोठी स्पर्धा! येत आहे महिंद्राची CNG एसयूव्ही, या तारखेला लाँच होणार
| Updated on: Oct 12, 2026 | 12:02 AM
Share

petrol आणि डिझेलच्या वाढत्या किंमती, E20 पेट्रोलवरुन चर्चा आणि मायलेज घटण्याची चिंता यात आता CNG कारची अचानक वाढली आहे. आता या सेगमेंटमध्ये काही नवी भिडू आता सीएनजी मार्केटमध्ये उतरत आहेत. यात आता देशातील प्रमुख कार निर्माती कंपनी महिंद्रा एंड महिंद्रा आपली पहिली फॅक्ट्री फिटेड सीएनजी कार XUV 3XO CNG ला बाजारात सादर करत आहे.

अलिकडेच महिंद्राच्या XUV 3XO CNG ला पर्वतमय भागात प्रॅक्टीस करताना पाहिले गेले. या टेस्टींगचा एक व्हिडीओ व्लॉगरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात कारचा मागचा भाग कोणत्याही कव्हर शिवाय दिसला. यामुळे याची डिझाईनची माहिती पुढे आली आहे. चला तर पाहूयात ही एसयुव्ही कशी आहे हे पाहूयात…

महिंद्रा XUV 3XO CNG ला 15 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृतपणे सादर केले जाणार आहे. या SUV ने कमी खर्चात सुव्हची मजा घेणाऱ्यांसाठी ही कार चांगला पर्याय ठरणार आहे. स्पाय फोटोत या कारचा मागचा भाग स्पष्ट दिसला आहे. याच्या डिझाईनमध्ये पेट्रोल आणि डिझेल मॉडेल सारखे अनेक एलिमेंट देण्यात आले आहेत. यात XUV 3XO ची बॅजिंग,रुफ रेल्स, रिअर स्पॉयलर आणि दोन्ही टेललँपला जोडणारी लाईट स्ट्रीप दिसते. या शिवाय SUV मध्ये मोटे ब्लॅक बंपर, सिल्व्हर स्कीड प्लेड आणि रिफ्लेक्टर्स देखील देण्यात आले आहेत.

XUV 3XO CNG स्पर्धा मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सन यांच्याशी

डिझाईनमध्ये मोठा बदल म्हणजे विंडस्क्रीनवर CNG स्टिकर लावण्यात आहेत.म्हणजे ही सुव्ह फॅक्ट्री -फिटेड सीएनजी किट सह येणार आहे. मात्र, कंपनीने अजूनपर्यंत कोणतेही डिझाईन आणि फिचर्स जाहीर केलेले नाही.

इंजिन आणि परफॉर्मेन्स

महिंद्रा XUV 3XO च्या पेट्रोल मॉडेलमध्ये सध्या 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनाचे दोन पर्याय दिले आहेत. याचे पहिले इंजिन मल्टी-पॉइंट फ्युल इंजेक्शन (MPFI) तंत्रज्ञानासोबत येते. ज्यामुळे 111hp ची पॉवर आणि आणखी 200Nm चे टॉर्क जनरेट करते. तर दुसरे इंजिन डायरेक्ट इंजेक्शन तंत्रज्ञानाने पूर्ण आहे. जे 131hp ची पॉवर आणि 230Nm चे टॉर्क देते. अशात सीएनजी व्हेरिएंटमध्ये कंपनीत कमी पॉवरवाले MPFI टर्बो-पेट्रोल इंजिनचा वापर करु शकतात. यामुळे SUV ची किंमत कमी राखण्यात मदत मिळणार आहे.

सध्या हे स्पष्ट नाही की महिंद्र XUV 3XO CNG ला कोणत्या गिअरबॉक्स असणार की नाही. याच्या पेट्रोलचे मॉडेल 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतात. कंपनी CNG व्हर्जनमध्ये यातील कोणते विकल्प देणार ? याची माहिती समोर आलेली नाही. याशिवाय CNG टँकची क्षमता आणि SUV मध्ये जागी फिट केले जाईल. याची कोणतीही माहिती मिळणार नाही.

काय किंमत ?

महिंद्रा XUV 3XO CNG ची किंमत सांगणे कठी आहे. पेट्रोल मॉडेलपेक्षा ही सीएनजी मॉडेल थोडी महाग असू शकते.सध्या XUV 3XO ची किंमत 7.79 लाख रुपयांनी सुरु होऊन टॉप मॉडल 15.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान जाते. सीएनजी व्हेरिएंटी पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 70 ते 1 लाख रुपये महाग असू शकते. जर बेस व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्याय मिळाल तर सुरुवातीची किंमत 8.50 लाख रुपये असू शकते.

Nexon-Brezza ना टेन्शन

बाजारात महिंद्राच्या एसयुव्हीचा थेट मुकाबला Tata Nexon आणि Maruti Brezza सारख्या कारशी होणार आहे. महिंद्रासाठी किंमतच नाही तर मायलेज देखील मोठा फॅक्टर ठरणार आहे, या दोन्ही एसयुव्हींची सुरुवातीची किंमक अनुक्रमे 8.35 लाख रुपये आणि 9.40 रुपये (एक्स-शोरूम)आहे. मायलेजचे बोलायचे झाले तर नेक्सन सीएनजीचा मायलेज 18 किमी/किग्रॅ तर ब्रेझा सीएनजी 26 किमी/किग्रॅ असा आहे

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ