AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Oct 11, 2026 | 12:21 PM
Share

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी फूट पडेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पक्षाचे चार प्रमुख नेते वेगळ्या भूमिकेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर, नवनाथ बन यांनी राऊतांना स्वतःचे खासदार सांभाळता न आल्याने भाजपनेते बोलू नये, असा पलटवार केला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात (भाजप) मोठी फूट पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजपचे चार प्रमुख नेते सध्या वेगळ्या मनस्थितीमध्ये असून, ते वेगळ्या भूमिकेत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या नेत्यांमध्ये संघातील मोठा वर्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. भूतकाळात इंदिरा गांधींच्या सत्तेला जगजीवन राम यांच्या पक्ष सोडण्याने मोठा धक्का बसला होता, तसेच हेमवतीनंदन बहुगुणांसारखे नेतेही पक्ष सोडून गेले होते. भाजपची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. चार महत्त्वाचे नेतेच वेगळी भूमिका घेतील. असंही त्यांनी सांगितलं.

राऊत यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पुढील सहा ते सात महिन्यांनंतर दिसणार नाही, कारण आताच त्यांची वाचा गेलेली आहे. भाजपमध्ये ‘देश प्रथम, नेशन फर्स्ट, पार्टी नंतर आणि शेवटी स्वतः’ हा अजेंडा असतो, मुख्यमंत्रीपद घेणे किंवा आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री करणे हा त्यांचा अजेंडा नसतो, असे राऊत यांनी म्हटले. मात्र, नवनाथ बन यांनी राऊतांच्या या वक्तव्यावर तीव्र पलटवार केला आहे. ज्यांना स्वतःचे खासदार सांभाळता आले नाहीत आणि जे डोळ्यासमोरून निघून गेले, त्यांनी भाजपमधील बंडाळीबद्दल बोलू नये, असे बन यांनी म्हटले.

Published on: Oct 11, 2026 12:21 PM

Follow Us