AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...

CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘भारतासाठी…

| Updated on: Oct 11, 2026 | 2:51 PM
Share

सीजेपीचे सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रांका यांनी पंतप्रधान मोदींवर तीव्र टीका करत त्यांना भ्याड संबोधले. मागील ७२ तासांत देशाने हुकूमशाहीचा नंगा नाच पाहिला असून, १९७५ च्या आणीबाणीपेक्षाही परिस्थिती वाईट असल्याचे रांका यांनी म्हटले.

दिल्लीत सुरू असलेल्या निषेध आंदोलनादरम्यान सीजेपी (CJP) चे नेते आशुतोष रांका, सौरभ दास, अभिजीत दिपके आणि रत्ना सिंग यांना जामीन मंजूर झाला आहे. अटी-शर्तींसह आणि हमीपत्र लिहून घेतल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. रांका यांनी पंतप्रधान मोदींना भारतातील सर्वात मोठे भ्याड आणि डरपोक पंतप्रधान असे संबोधले.

त्यांच्या मते, मोदी हे भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट आहेत. मागील ७२ तासांत देशाने हुकूमशाहीचा नंगा नाच पाहिला असून, हजारो शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, असे रांका यांनी नमूद केले. ते म्हणाले, “आम्हाला विमानातून अपहरण करून नेण्यात आले.” १९७५ च्या आणीबाणीची आठवण करून देत रांका यांनी दावा केला की, त्यावेळीही देशात रेल्वे बंद करण्याची गरज पडली नव्हती, पण आजची परिस्थिती त्याहूनही वाईट आहे.

Published on: Oct 11, 2026 02:51 PM

Follow Us