AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!

शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!

| Updated on: Oct 11, 2026 | 5:21 PM
Share

अमित ठाकरे यांना शिवाजी पार्क येथे पोलिसांनी अडवले. त्यानंतर ते संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्लीतील घटनांचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्रातही अशीच दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला. अमित ठाकरे यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा पवित्रा घेतला असून, लोकशाही धोक्यात असल्याचा इशारा दिला.

शिवाजी पार्क परिसरात संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना पोलिसांनी अडवल्याने ते संतप्त झाले. शिवाजी पार्कच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ज्या पद्धतीने तरुणांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधला, त्यावर ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे यांनी म्हटले की, शिवाजी पार्कला “वॉर झोन” बनवले आहे का? त्यांनी दिल्लीतील नुकत्याच घडलेल्या घटनांचा उल्लेख करत पोलिसांच्या दडपशाहीवर टीका केली. फ्लाईटमधून अभिजीत दिपकेंना डिटेन करणे आणि मुलींवर हात उचलणाऱ्या भाजपच्या गुंडांचाही त्यांनी उल्लेख केला.

महाराष्ट्रातही दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारानंतर संतप्त झालेले अमित ठाकरे यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. “मला डिटेन करून दाखवा, मी पोलीस स्टेशनला चाललो आहे. त्यांना जे उखडायचं आहे ते उखडू देत,” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना आव्हान दिले. तरुणांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत लोकशाही धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

Published on: Oct 11, 2026 05:21 PM

Follow Us