नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त
नवी मुंबईतील नागरिकांना शुद्ध दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. महापे एमआयडीसी परिसरातील एका दूध डेअरीवर छापे टाकून तेथे मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. या कारवाईत एकूण 1 हजार 309 लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली […]
नवी मुंबईतील नागरिकांना शुद्ध दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. महापे एमआयडीसी परिसरातील एका दूध डेअरीवर छापे टाकून तेथे मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. या कारवाईत एकूण 1 हजार 309 लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या डेअरीमध्ये दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाण्याचा वापर करून भेसळ केली जात होती. अशाप्रकारे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जात होते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
छापेमारीनंतर जप्त करण्यात आलेल्या दुधाची सखोल तपासणी करण्यात आली. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर, आरोग्यासाठी हानिकारक असलेले हे संपूर्ण 1 हजार 309 लीटर भेसळयुक्त दूध तातडीने नष्ट करण्यात आले. एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांवर अंकुश बसण्यास मदत होणार असून, नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
Published on: Aug 25, 2026 04:54 PM
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला

